Tanhaji: The Unsung Warrior Trailer: हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणार्या अनेक मावळ्यांची कहाणी आपण ऐकली, पाहिली आहे.परंतू पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर तानाजी मालुसरे या शिवरायांच्या मावळ्याचा पराक्रम हिंदी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. कोंढणा किल्ला जिंकण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे तानाजी मालुसरे पहिल्यांदाच चित्रपटाच्या ' Tanhaji: The Unsung Warrior 'माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. आज या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर रसिकांसमोर आला आहे. तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय देवगण तर उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान झळकणार आहे. या सिनेमात या दोघांची टक्कर पाहणं रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. Tanhaji चित्रपटानंतर देशातील अन्य स्वातंत्र्य सैनिकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची एक मालिकाच काढण्याची Ajay Devgn ची योजना.
सिनेमामध्ये 17 व्या शतकात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांचा हा पराक्रम सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रसिकांसमोर येणार आहे. हा सिनेमा 3 डी माध्यमातूनही रीलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे युद्धप्रसंगांदरम्यानची थरारक अनुभव खास असतील.
तानाजी हा सिनेमा ओम राऊत या मराठमोळ्या दिगदर्शकाचा असून 10 जानेवारी 2020 दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अनेक दिवसांनी काजोल- अजय देवगण ही रिअल लाईफ जोडी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तानाजी या सिनेमाच्या माध्यमातून काजोल पहिल्यांदाच मराठमोळ्या आणि ऐतिहासिक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार असल्याने आता तिच्या मराठी चाहत्यांमध्येही या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. Tanhaji सिनेमाच्या ट्रेलर पूर्वी प्रदर्शित झाला 'काजोल'चा सावित्रीबाई मालुसरे यांच्या अंदाजातील पोस्टर.
तानाजी सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर
तानाजी सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत अजय देवगण, त्याच्या समोर खलनायकाच्याअंदाजात सैफ अली खान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर तर तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई काजोल साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे लूक शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे या सिनेमाची सोशल मीडियामध्ये चर्चा आहे. आता अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्याची आणि तानाजी मालुसरे यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.