अजय देवगण- काजोल ही बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी आगामी सिनेमा 'तानाजी' मधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज या सिनेमातील काजोलचा लूक रसिकांसमोर आला आहे. काजोल तानाजी (Tanhaji) सिनेमामध्ये सावित्रीबाई मालुसरे (Savitribai Malusare) यांची भूमिका साकारणार आहे. सावित्रीबाई मालुसरे या तानाजी मालुसरेंच्या पत्नी होत्या. आज (18नोव्हेंबर) दिवशी काजोलचा केशरी साडीमधील मराठमोळ्या अंदाजातील लूक शेअर करण्यात आला आहे. उद्या 'तानाजी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तानाजी सिनेमामध्ये शरद केळकर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका.
'तानाजी' या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा 'तानाजी मालुसरे' यांचा प्रताप रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी प्राणांची बाजी लावली होती. त्यावेळेस शिवरायांनी ' गड आला पण सिंह गेला' अशा शब्दामध्ये त्यांच्या साहसतेचं कौतुक केलं होतं. मात्र इतिहासाच्या पानांमध्ये त्यांचा उल्लेख केवळ मोजक्याच शब्दामध्ये पहायला मिळतो. Tanhaji चित्रपटानंतर देशातील अन्य स्वातंत्र्य सैनिकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची एक मालिकाच काढण्याची Ajay Devgn ची योजना.
सावित्रीबाई मालुसरे यांच्या अंदाजात काजोल
Savitribai Malusare - Tanhaji ke saahas ka sahara... aur unke bal ki shakti. #TanhajiTheUnsungWarrior in cinemas 10th January 2020. TANHAJI TRAILER TOMORROW@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/i2CcMbWcAa
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 18, 2019
'तानाजी' हा सिनेमा येत्या 10 जानेवारी 2020 दिवशी रीलिज होणार आहे. या सिनेमामध्ये अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर काजोल त्याच्या पत्नीच्या रूपात दिसेल. यासोबतच शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान हा मुघल राजाची भूमिका साकारणार आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत देखील या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.