सध्या बॉलिवूड आणि मराठी सिनेमांमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. लवकरच अजय देवगण मुख्य भूमिकेमध्ये असलेल्या 'तानाजी' (Tanhaji) सिनेमाची बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. आज तानाजी सिनेमामधील काही व्यक्तीरेखांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा शरद केळकर (Sharad Kelkar) झळकणार आहे. आज त्याचा लूक ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना त्याने आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. Tanhaji चित्रपटानंतर देशातील अन्य स्वातंत्र्य सैनिकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची एक मालिकाच काढण्याची Ajay Devgn ची योजना.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवाभावाच्या मावळ्यांमध्ये तानाजी मालुसरे हे एक होते. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी प्राणांची बाजी लावली. त्यावेळेस शिवरायांनी त्यांच्या हौताम्याचं वर्णन 'गड आला पण सिंह गेला' असं केलं होतं. आता हाच पराक्रम रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे.
पहा शरद केळकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील अंदाज
एखाद्या कलाकरासाठी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पेहरावात त्यांची देहबोली साकारण्याऐवढी भाग्याची आणि पवित्र गोष्ट कुठलीच नाही....
हर हर महादेव... 🙏🏼🙏🏼#TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020. #TanhajiTrailerOnNov19@ajaydevgn @itsKajolD @omraut @ADFFilms @TSeries pic.twitter.com/kpZPtMx8XX
— Sharad Kelkar (@SharadK7) November 14, 2019
तानाजी सिनेमामध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका शरद केळकर याने साकारली असून एखाद्या कलाकरासाठी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पेहरावात त्यांची देहबोली, साकारण्याऐवढी भाग्याची आणि पवित्र गोष्ट कुठलीच नाही....हर हर महादेव! असं ट्विट त्याने केलं आहे.
ओम राऊत याने 'तानाजी' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून 10 जानेवारी 2020 दिवशी हा सिनेमा रीलीज होणार आहे. या सिनेमामध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारत आहे तर त्याच्या सोबतच सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, काजोल देखील खास भूमिकांमध्ये दिसणार आहेत.