तान्हाजी: स्वत:च्या चित्रपटावर टीका केल्यानंतर सैफ अली खान ठरला सोशल मीडियावरील ट्रोल चा शिकार
सैफ अली खान (Photo Credits: Instagram)

Saif Ali Khan Gets Trolled: एकीकडे बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट सुपर हिट ठरत आहे तर दुसरीकडे या चित्रपटातील एक अभिनेता मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटात उदयभान हे पात्र साकारणारा बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. कारण त्याने नुकतीच देशाबद्दल केलेली एक कमेंट नेटकऱ्यांना अजिबात आवडलेली नाही. नुकत्याच अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत सैफने केलेल्या टिप्पणीमुळे त्याने स्वतःसाठी नवीन अडचणी तयार केल्या आहेत.

भारताच्या इतिहासाला लक्ष्य करणारे सैफ यांची टिप्पणी बर्‍याच जणांना खटकली आहे. रविवारी सैफने म्हटले की ब्रिटीश इथे येईपर्यंत भारताची कल्पना कोणाला सुचली असेल असे त्यांना वाटत नाही. तो म्हणाला,"चित्रपटातील ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्साही होतो, कारण ही खूपच वेगळी भूमिका आहे. जेव्हा लोक म्हणतात की हा इतिहास आहे, मला वाटत नाही की हा इतिहास आहे. इतिहास काय आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मला असे वाटत नाही की ब्रिटीशांनी भारताची संकल्पना देईपर्यंत ती कोणाला सुचली होती." त्याच्या या वक्तव्यामुळे त्याला ट्रॉल्सला सामोरे जावे लागत आहे. इतकंच नव्हे तर नेटकऱ्यांनी त्याच्या मुलाला म्हणजेच तैमूरसुद्धा टार्गेट केलं आहे. पहा नेटकऱ्यांच्या या काही प्रतिक्रिया,

काठियावाड येथे राहणारी गंगा कशी बनली कामाठीपुरा मधील 'गंगुबाई काठियावाडी'? जाणून घ्या तिच्या आयुष्याची खरी कहाणी

हिंदी फिल्म इंडस्ट्री तन्हाजीसारखे चित्रपट का बनवत आहे हे सांगताना सैफने म्हटले की, "हेच चालते." पुढे तो म्हणाला, “मला खरोखरच ‘अहो हाच इतिहास आहे’ असे म्हणणाऱ्या चित्रपटाचा भाग होण्यापेक्षा अशा चित्रपटाचा भाग व्हायचं आहे जो एक स्टॅन्ड घेईल."