काठियावाड येथे राहणारी गंगा कशी बनली कामाठीपुरा मधील 'गंगुबाई काठियावाडी'? जाणून घ्या तिच्या आयुष्याची खरी कहाणी
Alia Bhatt (Phtto Credits: Instagram)

Ganga From Kathiwad To Gangubai Kathiawadi: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि आलिया भट्ट अभिनित 'गंगूबाई काठियावाडी' या बहुवरतीक्षित चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये आलियाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आला असून सोशल मीडियावर हा पोस्टर सध्या धुमाकूळ घालत आहे. पत्रकार व लेखक एस. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील गंगुबाई यांच्या व्यक्तिचित्रणावर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. परंतु, या चित्रपटात आलिया साकारणार असलेल्या गंगुबाई काठियावाडी या नेमक्या कोण होत्या व त्यांची खऱ्या आयुष्यातील कहाणी काय होती हे आज आपण जाणून घेणार आहोत.

दरम्यान, 60 च्या दशकामध्ये गंगुबाई या मुंबईतल्या कामाठीपुरा येथे कुंटणखाना चालवण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचं खरं नाव, गंगा हरजीवनदास काठियावाडी असं असून त्या गुजरातमधल्या काठियावाड येथे  त्यांचा जन्म झाला होता. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या देखील झाल्या.

Gangubai Kathiawadi First Look: गँगस्टरच्या रुपातील अभिनेत्री आलिया भट्ट हिचा 'गंगूबाई काठियावाड़ी' मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

एक चांगल्या घरातील मुलगी अचानक धंदा करायला कशी लागली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर म्हणजे तिची झालेली फसवणूक. गंगा रमणिकलाल नावाच्या एका अकाऊंटंटच्या प्रेमात पडली. परंतु, तिच्या कुटुंबाने या लग्नास नकार दिल्याने ती घर सोडून मुंबईला पळून आली. परंतु, तिचं दुर्दैव म्हणजे त्या माणसाने तिला फसवलं आणि मुंबईतील कामाठीपुरा येथे नेऊन तिला विकलं. तिथे गेल्यावर, तिच्या लक्षात आलं की आपल्या परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. इतकंच काय तर तिला तिच्या कुटुंबातील कोणी स्वीकरालंही नसतं हे मान्य करून तिने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. नाइलाजापोटी ती वेश्याव्यवसाय करू लागली. हळूहळू, ती कामाठीपुऱ्यातल्या कुटुंणखान्यांची प्रमुख बनली.

अशी आहे ही गंगुबाई काठियावाडी. तिच्या व्यक्तिमत्त्वात इतरही पैलू होते जे आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळतील यात शंका नाही.