Gangubai Kathiawadi First Look: गँगस्टरच्या रुपातील अभिनेत्री आलिया भट्ट हिचा 'गंगूबाई काठियावाड़ी' मधील फर्स्ट लूक प्रदर्शित
Alia Bhatt (Phtto Credits: Instagram)

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाड़ी' (Gangubai Kathiawadi) या मधील तिचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आला आहे. संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) यांचा हा चित्रपट असून आलियाच्या चाहत्यांना ती एका धमाकेदार रुपात आणि गॅंगस्टरची भुमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. मंगळवारी गंगूबाई काठियावाड़ी चित्रपटाचा टीझर पोस्ट करण्यात आला होता. तर आज आलिया हिचा चित्रपटातील पहिला लूक समोर आला असून चाहत्यांना आता तिच्या भुमिकेबाबत उत्सुकता लागली आहे.

आलिया पहिल्यांदाच गंगूबाई काठियावाड़ी या चित्रपटातून एका गँगस्टरच्या रुपातील भुमिका साकारत आहे. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आलियाच्या चित्रटातील लूक बाबत बोलायचे झाल्यास, डिपनेक ब्लाऊज आणि लांब स्कर्टच्या सोबत चेहऱ्यावरील तिचे भाव, बाजूला असलेली पिस्तूल या गोष्टींवर तिची भुमिका तडफदार असणार असल्याचे स्पष्ट होते.

तसेच डोक्यावर लाल रंगाचे कुंकू, नाकात नथ हा लूक ती एक माफिया असल्याचे भासवते. चित्रपटाची कथा ही हुसैन जैदी यांच्या पुस्तकातून माफिया क्विन ऑफ मुंबई मधील आहे. पण खरी कथा ही गंगूबाई काठीयावाडी हिच्या आयुष्यातील वेश्या मालक आणि स्री प्रधान संस्कृतीवर आधारित आहे.(अनुष्का शर्मा ही खेळणार क्रिकेट; महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी वर बनणाऱ्या बायोपिकमध्ये निभावणार मुख्य भूमिका, पाहा हे Photos)

आलियाचा हा तगडा लूक सर्वांनाच मोहून टाकणारा आहे. लूक प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूड हंगामा यांनी असे सांगितले होते की, आलियाचा लूक एका गँगस्टरच्या कपड्यांनुसार असणार आहे.

Gangubai Kathiawadi First Look: आलिया भट्ट हिचा 'गंगूबाई काठियावाड़ी' मधील फर्स्ट लूक प्रदर्शित Watch Video

त्याचसोबत यामध्ये कोणताही ग्लॅमर लूक देण्यात येणार नाही. एवढेच नाही तर डबिंगसाठी आलियाला दुसरी संधी जाणार नसून ऑन सेट जे डायलॉग बोलले जातील तेच अंतिम असणार आहेत.