Taimur Ali Khan बनला शेफ, आपल्या पाककलेतून आपला छोटा भाऊ आल्याचा आनंद केला व्यक्त
Chef Tim (Photo Credits: Instagram)

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) दुस-यांदा आई झाल्याची बातमी अगदी वा-यासारखी सगळीकडे पसरली. 21 फेब्रुवारीला करीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बातमीने कुटूंबाइतकाच आनंद या बाळाचा मोठा भाऊ झालेल्या तैमुरला देखील झाला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी तैमुर अली खान (Taimur Ali Khan) शेफ बनला आहे. आपल्या लाडक्या छोट्या भावासाठी कुकीज बनवून त्याने हा आपला आनंद व्यक्त केला आहे. आई करीना कपूर हिने हा क्युट फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

करीनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तैमुरने सफेद रंगाचा कुर्ता घातला असून त्याच्या हातामध्ये कुकीज बनविण्याचा ट्रे आहे. त्यात त्याने कुकीजद्वारे 4 कॅरेक्टर बनवले आहेत. ज्यात करीना, सैफ अली खान, छोटा नवाब आणि तैमुर दिसत आहे.हेदेखील वाचा- Aamir Khan च्या वाढदिवसानिमित्त Kareena Kapoor ने सोशल मिडियावर शेअर केला खास फोटो, म्हणाली, Happy Birthday My Lal

करिनाने हा फोटो शेअर करुन त्याखाली 'माय मॅन इन फ्रेम', असे लिहिले आहे. त्याचबरोबर तिने #ChefTim आणि #FavouriteBoys असा हॅशटॅग वापरला आहे.

या फोटोवर त्याचे चाहते कमेंट्सचा वर्षाव करत असून अनेक बॉलूवड कलाकारांनीही कमेंट्स दिले आहेत.

करिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, गेल्या काही दिवसांपूर्वी अलौकिक देसाईंनी त्यांचा आगामी सिनेमा 'सीता-द इनकार्नेशन' ची घोषणा केली होती. चित्रपटाच्या घोषणेनंतर सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, सीताच्या भूमिकेसाठी आता करीना कपूर खानचे नाव निश्चित झाले आहे. परंतु अद्याप या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर जर करीनाने या चित्रपटास नकार दिला तर ही भूमिका साकारण्यासाठी आलिया भट्टचा विचार केला जाऊ शकतो.