Taimur Ali Khan: फोटो काढणा-या मिडियावर भडकला तैमूर अली खान, 'या' शब्दांत दिली सक्त ताकीद, Watch Video
Taimur Ali Khan (Photo Credits: Yogen Shah)

सध्या स्टार्सपेक्षा स्टारकिड्सची (Starkids) मिडियाप्रमाणे लोकांमध्ये देखील जास्त क्रेज आहे. या स्टारकिड्समध्ये बॉलिवूडमधील सर्वात जास्त लोकप्रिय चेहरा म्हणजे तैमूर अली खान (Taimur Ali Khan). अगदी जन्मल्यापासून 4 वर्षाचा होईपर्यंत जिथे जाईल त्या ठिकाणी तो सतत मिडियाच्या गराड्यात असतो. त्याचे प्रत्येक हावभाव टिपण्यासाठी मिडिया आतुर असते. तो काय करतो, कसा राहतो, काय खातो, काय कपडे घालतो हे सर्व जाणून घेण्यासाठी मिडिया उत्सुक असते. त्याचे फोटो काढण्यासाठी मिडियाला तारेवरची कसरत करावी लागते. मात्र याच स्टारडमला चिमुकला तैमुर आता कंटाळला असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्याचा एक मजेशीर व्हिडिओ विरलबयाणी याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या हावाभावावरून आणि कॅमे-याच्या फ्लॅशला तैमुर किती कंटाळला आहे हे स्पष्ट दिसत आहे.

येत्या 20 डिसेंबरला तैमुरचा चौथा वाढदिवस आहे. त्याआधी तो आपल्या आजीच्या बबीता कपूर यांच्या घरी आपल्या आई करीना कपूर (Kareena Kapoor Khan) सोबत गेलेला असताना मिडियाने त्याला घेरले. त्यावेळी त्याने वैतागून मिडियाला काय ताकीद दिली ते ऐका....

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मिडिया त्याचे लांबून फोटो काढत असताना 'नो फोटोज' असं तो मोठ्या आवाजात ओरडला. फोटो काढू नका असे तो सांगताना दिसत आहे. एवढच नव्हे तर मिडियाकडे रागाने बघत तैमुर आपले विचित्र हावभाव देखील करत आहे.हेदेखील वाचा- Taimur Ali Khan Cute Photos: वडील सैफ अली खान सोबत शेती करताना दिसला तैमूर; पहा क्यूट फोटोज

विरल बयाणी शेअर केलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. थोडक्यात स्टारकिड्स होणं ही जितकी आनंदाची गोष्ट आहे तितकीच ती त्रासदायक देखील हेच तैमुरच्या हावभावांवरुन दिसत आहे.

दरम्यान त्याची आई अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आई होणार असून आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. तिच्या या गोड बातमीने कपूर आणि पतौडी कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे.