Taimur Ali Khan Cute Photos: वडील सैफ अली खान सोबत शेती करताना दिसला तैमूर; पहा क्यूट फोटोज
सैफ अली खान आणि तैमूर अली खान (Photo Credits: Instagram)

Taimur Ali Khan Cute Photos: बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे. तसेच करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) म्हणजेचं छोटा नवाब सर्वात लोकप्रिय स्टार किड्स आहेत. सोशल मीडियावर तैमूरचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. अलीकडेचं तैमूर आणि सैफ अली खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात वडील आणि मुलगा पतौडी पॅलेसमध्ये शेती करताना दिसत आहेत.

तैमूर आणि सैफ अली खानचा हा फोटो गेल्या महिन्यातील आहे. जेव्हा सैफ अली खान त्याच्या संपूर्ण कुटूंबासह सुटीसाठी पॅलेसमध्ये गेला होता. परंतु, सध्या हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या व्हायरल फोटोंमध्ये तैमूर चिखल आणि पाण्यात उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच इतर फोटोंमध्ये तो चिखलयुक्त पाण्यात खेळताना दिसत आहे. तैमूर आणि सैफने लॉकडाऊन काळात शेतीचा भरपूर आनंद लुटला. तैमूरचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना फारचं आवडला आहे. (हेही वाचा -महेश कोठारे यांचा झपाटलेला चित्रपट पाहताना त्यांची नात जिजा ने दिलेली 'ही' मजेशीर प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर, Watch Video)

सैफ अली खान आणि करीना कपूर लवकरचं दुसऱ्यांदा पालक बनणार आहेत. स्वत: सैफ आणि करीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलताना करीना कपूर आमिर खान स्टारर फिल्म 'लालसिंग चड्ढा' मध्ये दिसणार आहे. तसेच सैफ अली खान यश राजच्या 'बन्टी और बबली' या चित्रपटात दिसणार आहे. (हेही वाचा - Diwali 2020: बच्चन कुटुंबिय यंदा दिवाळी पार्टीचं आयोजन करणार नाहीत; अभिषेक बच्चन ने सांगितलं 'हे' कारण)

दरम्यान, करीना कपूरचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये करीना कपूरने रूढीवादी विचारांवर प्रश्न उपस्थित केला आहे. यात करीनाने म्हटलं आहे की, 'जास्त अभ्यास केला तर ऐ चश्मिश. लिपस्टिक जास्त लावली तर, ए हिरोईन. घरी उशीरा आलं तर चारित्र्यावर शंका. मला फक्त हे विचारायचं आहे की, यात माझा हक्क कोठे आहे?' करिनाचा हा व्हिडिओ जुना आहे. परंतु, तिने उपस्थितीत केलेल्या प्रश्नांमुळे नेटीझन्सनी या व्हिडिओला लाईक्स तसेच कमेन्ट्स केल्या आहेत.