Sushmita Sen Birthday Special: रोमांटिक फोटो शेअर करत सुष्मिता सेनच्या बॉयफ्रेंडने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Photo)
सुष्मिता सेन (Photo Credits: Instagram)

मिस युनिव्हर्स, मॉडेल, अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) आज 43 वा वाढदिवस आहे. यंदाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही असणार आहे. काही दिवसांपासून सुष्मिता सेन आपल्यापेक्षा 15 वर्षे लहान असलेल्या रोहमन शॉलला (Rohman Shawl) डेट करत असल्याची चर्चा आहे. पण ही चर्चा खोटी नसल्याचे रोहमनच्या एका पोस्टवरुन सिद्ध झाले आहे. रोहमनने सुष्मिताला वाढदिवासानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. रोहमनने सुष्मितासोबतचा रोमांटिक फोटो शेअर करत लिहिले की, "हॅप्पी बर्थडे माय जान! येणारं वर्ष तुला सुख-समानाधानाचं, समृद्धीचं जावो."

 

सुष्मिता रोहमन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सर्वत्र आहेत. काही महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. यंदाची दिवाळीही दोघांनी एकत्र साजरी केली. बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेनने अशी साजरी केली दिवाळी (Photos)

सुष्मिता अविवाहीत असून तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. फॅशन इव्हेंटदरम्यान रोहमन आणि सुष्मिताची ओळख झाली. यापूर्वी सुष्मिताचे नाव विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, वसीम अक्रम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही जोडले गेले होते.