सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना सुष्मिता सेनच्या नव्या प्रेमाच्या चर्चांनाही बहर आला आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेन आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले. आता पुन्हा एकदा हे कपल दिवाळी एकत्र सेलिब्रेट करताना पाहायला मिळत आहे. शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले. आता सुष्मिता सेनने कुटुंबियांसोबत दिवाळी सेलिब्रेट करतानाचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बॉयफ्रेंड तिच्या मुलींसोबत दिवाळी सेलिब्रेट करताना दिसत आहे.
या फोटोसोबत सुष्मिताने व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत मुली रेने आणि आलिशा बूम फ्लोस चॅलेंज शिकताना दिसत आहेत.
सुष्मिता सेन गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असते. यापूर्वी सुष्मिताचे नाव विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, वसीम अक्रम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही जोडले गेले होते.