सुशांत सिंह राजपूत ला 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार' जाहीर, अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर केली घोषणा
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याला  दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने (Dadasaheb Phalke International Film Festival Award 2021) गौरविण्यात येणार आहे. ही सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून याची घोषणा या 'dpiff' या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर करण्यात आली आहे. प्रत्येक  विशेष करुन सुशांतच्या लाखो चाहत्यांना अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे.

सुशांत सिंह राजपूतला मरणोत्तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार 2021 ने गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा कधी होणार याबाबत अद्याप निश्चित तारीख सांगण्यात आली नाही.

Sushant Singh Rajput Case: सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने रिया चक्रवर्तीला विचारला प्रश्न, म्हणाली पैसे नाहीत तर देशातील सर्वात महागडा वकिल कसा नियुक्त केलास?

मागील महिन्यात कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीतर्फे सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्विकारला होता. याविषयी तिने सोशल मीडियावर माहिती देखील दिली होती.

दरम्यान सुशांत सिंग राजपूत याचे वडील के. के सिंह (KK Singh) यांनी ANI वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीमध्ये रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामते, 'रिया सुशांत सिंह राजपूतला अनेक वर्षांपासून विष देत होती. रिया सुशांतच्या मृत्यूला जबाबदार आहे. तपास यंत्रणांनी रियासोबत तिच्या सहकार्‍यांना अटक करावी' अशी मागणी केली आहे.