Sushant Singh Rajput Suicide Case: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यावर त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु आहे, दर दिवशी त्याच्या मृत्यूशी संबंधित नवनवीन माहिती समोर येत असते. यातील बहुतांश वृत्त हे तर्कवितर्क असून बऱ्याचदा खोटे दावे असतात. अशीच काहीशी माहिती आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. सुशांत च्या मृत्यूनंतर त्याचा पाळीव कुत्रा फज याने अन्नपाणी सोडून दिले आणि त्यामुळे अशक्त होऊन त्याचे निधन झाले अशी ही पोस्ट आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वीच सुशांतचा कुत्रा फज (Fudge) याची सुशांतच्या मृत्यूनंतर अगदी वाईट अवस्था झाली आहे तो सतत उदास असतो असे सांगणारेही काही फोटोज व्हायरल झाले होते. मात्र आता समोर येणाऱ्या माहितीनुसार ही व्हायरल पोस्ट (Viral Post) अर्धी खरी असल्याचे स्पष्ट होत आहे. Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नेमकी आहे कोण? सोशल मीडियावर होतेय चर्चा (See Photos)
टाइम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्ट अनुसार, सुशांत सिंह राजपूत चा कुत्रा फज हा उदास आहे हे जरी कुठेतरी खरं असलं तरीही तो आजारी आहे वैगरे सर्व माहिती खोटी आहे. फज आणि त्याच्यासोबतच अन्य तीन पाळीव कुत्रे सुद्धा सुशांतच्या घरी आहेत आणि ते सुदृढ आहेत. Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत याच्या घरातून मुंबई पोलिसांनी जप्त केल्या 5 डायऱ्या
पहा व्हायरल पोस्ट
News Coming that Sushant's Dog Fudge is also Died
He stopped eating....💔#FIRForSushantUnder302 pic.twitter.com/AgkCjf21FX
— Shivam ❤️ Love You Sushant (@Intrepid_SK) June 22, 2020
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येची कसून तपासणी होत आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तिची सुद्धा चौकशी सुरु आहे मात्र अजूनही सुशांतने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे स्पष्ट झालेले नाही.