दिवाळीनिमित्त सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांनी अशा पद्धतीने काढली अभिनेत्याची आठवण, श्वेता सिंह किर्ती हिने व्हिडिओ शेअर करत मानले आभार
सुशांत सिंह राजपूत(Photo Credits: Instagram)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहिण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) हिने सुशांतच्या चाहत्यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत. कारण त्यांनी आता सुद्धा सुशांत याची कमी कुठेच पडू दिली नाही आहे. याच पार्श्वभुमीवर श्वेता किर्ती हिने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये सणाच्या पार्श्वभुमीवर सुशांत याची एका खास पद्धतीने आठवण कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामधून सुशांत याला श्रद्धांजली दिली गेली आहे.(Sushant Singh Rajput च्या मृत्यूला चार महिने पूर्ण; बहिण श्वेता सिंह कीर्तीने डिलीट केले आपले ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट्स)

व्हिडिओसोबत श्वेता हिने असे लिहिले आहे की, ही दिवाळी सुशांत सारखी... असाच होता. मी त्या सर्वांचे आभार मानते ज्यांनी भावाला त्यांच्या आशीर्वादात आणि दृदयात ठेवून दिवाळी साजरी केली आहे. #Diwali4SSR #YehDiwaliSushantWali असे हॅशटॅग सुद्धा तिने पोस्ट मध्ये वापरले आहेत. तुम्ही लोक आमचा परिवार आहात. प्रत्येत पावलावर आणि वळणावर आम्ही तुमचे प्रेम आणि समर्थन आजमवले आहे. धन्यवाद.(Ankita Lokhande हिने इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून आपला श्री स्वामी समर्थांवर प्रचंड विश्वास असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल सांगितली 'ही' मोठी गोष्ट)

या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सुशांतची आठवण काढत एक रांगोळा काढण्यात आली आहे. त्याच्या फोटोसमोर मेणबत्ती लावून त्याला श्रद्धांजली सुद्धा दिली जात आहे.