Sushant Singh Rajput, Shweta Singh Kirti (Facebook, Twitter)

आज 14 ऑक्टोबर, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला चार महिने पूर्ण झाले. या दरम्यान सुशांत सिंह राजपूतची अमेरिकेची बहीण श्वेतासिंह कीर्ती (Shweta Singh Kirti) सोशल मीडियावर सक्रियपणे आपल्या भावासाठी न्यायाची मागणी करत होती. आता श्वेतासिंह कीर्तीने तिचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट्स डिलीट केली आहेत. यामागचे ठोस कारण समजू शकले मात्र आता श्वेतासिंह कीर्तीचे अकाउंट्स दिसत नाहीत. आतापर्यंत गेल्या चार महिन्यांमध्ये श्वेताने आपल्या अकाउंट्सवर सुशांतचे अनेक फोटोज व व्हिडिओज प्रसिद्ध केले आहेत.

याआधी श्वेतासिंह कीर्तीने किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. काल रात्री श्वेताने सुशांतचा त्याच्या चार महिन्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक प्रेरणादायक व्हिडिओ पोस्ट केला होता. याबाबत श्वेताने लिहिले होते, 'A True Inspiration #ImmortalSushant'. व्हिडिओमध्ये, अभिनेता सुशांतसिंह राजपूत त्याच्या एका चित्रपटासाठी कठोर परिश्रम करताना दिसत आहे. यामध्ये तो सायकल चालवणे, जॉगिंग आणि धावणे यांसारख्या गोष्टी करत आहे. (हेही वाचा: Ankita Lokhande हिने इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून आपला श्री स्वामी समर्थांवर प्रचंड विश्वास असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल सांगितली 'ही' मोठी गोष्ट)

यापूर्वी श्वेताने SSR चाहत्यांना 'मन की बात 4 एसएसआर' मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हॉईस मेसेज पाठविण्यास उद्युक्त केले होते. दरम्यान, सुशांतचा खून झाला असल्याचे कुटुंब सांगत आहे. अशा परिस्थितीत श्वेता कुटुंबाच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडत होती. श्वेता अमेरिकेत राहते. तिने अमेरिकेसह जगातील इतर देशांतील फोटोही शेअर केली होती, ज्यात सुशांतचे चाहते त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत होते. आता अचानक श्वेताचे सोशल मीडिया अकाउंट बंद झाल्याने सुशांतच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान, सीबीआय सध्या सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. अलीकडेच एम्सच्या पथकाने सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाचे पुनर्मूल्यांकन केले आणि असा निष्कर्ष काढला की त्याची हत्या केली गेली नव्हती. त्याच्या मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला. एम्सच्या टीमने त्यांचा अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. सीबीआयबरोबरच एनसीबी आणि ईडीसारख्या अन्य तपास यंत्रणाही या प्रकरणात तपास करीत आहेत.