Ankita Lokhande हिने इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून आपला श्री स्वामी समर्थांवर प्रचंड विश्वास असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल सांगितली 'ही' मोठी गोष्ट
Shree Swami Samarth And Ankita Lokhande (Photo Credits: Instagram)

दिवंगत सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने सुशांतबाबत काही गौप्यस्फोट करुन संपूर्ण बॉलिवूड ढवळून टाकले होते. एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने केलेले सुशांतबद्दल काही गौप्यस्फोट सर्वांसाठी धक्कादायक होती. त्यामुळे लोकांचीही खात्री पटली की सुशांत आत्महत्या करणार नाही. त्यानंतर ती सुशांत सिंह प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून अॅक्टिव राहिली. तसेच सुशांतसाठी करण्यात आलेल्या अनेक कॅम्पेनमध्ये तिने सहभाग घेतला. मात्र कालपासून सुशांतने आत्महत्याच केल्याचे CBI कडून सांगण्यात आल्याच्या बातम्या वा-याच्या वेगाने पसरू लागल्या. या बातम्यांनी अंकिता थोडीशी बिथरली असून या अवस्थेत आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) आहेत असे सांगत तिने एक भावूक पोस्ट केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिने श्री स्वामी समर्थांची महती सांगणारी पोस्ट केली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, 'तुमचा स्वामींवरचा विश्वास तुटू देऊ नका. तुम्हाला कधी कधी वाटत हे कसं शक्य आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा.' Sushant Singh Rajput Case: अंकिता लोखंडे चे शिबानी दांडेकर ला सडेतोड उत्तर, '2 सेकंदाचे फेम' कमेंट्सवर दिली 'ही' प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

Shree swami samartha🙏🏻

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून CBI कडे देण्यात आला होता. मात्र तपासात ही आत्महत्याच असल्याचे सांगण्यात आल्यामुळे अंकिता आणि सुशांतचे चाहते देखील नाराज आहेत. यामुळे काहींचा कदाचित देवावरचा विश्वास कमी झाला असेल. अशा परिस्थितीत त्याच्या चाहत्यांनी देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. स्वामी सर्व काही ठिक करतील असे अंकिता लोखंडे या पोस्टमध्ये म्हणत आहे.