मुंबई पोलिसांकडून सुशांतचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे; वकील विकास सिंह यांचा गंभीर आरोप
Sushant Singh Rajput Funeral । Photo Credits: Facebook

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत (Sushant Singh Rajput) चे आत्महत्या (Suicide) प्रकरण नव-नवीन वळण घेताना दिसत आहे. सध्या मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सुशांतचे वडील के. के. सिंह (K.K. Singh) यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. सुशांतचे केस लढणारे वकील विकास सिंह (Lawyer Vikas Singh) यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई पोलिसांकडून सुशांतचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी प्रतिक्रिया विकास सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान, विकास सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 38 लोकांची चौकशी केली. मात्र, या चौकशीतून काहीही साध्य झालेलं नाही. पोलिसांनी आतापर्यंत केवळ मोठ्या उद्योजकांना चौकशीसाठी बोलावल आहे. परंतु, सुशांतच्या आसपास असलेल्या लोकांची अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत ची बहिण श्वेता किर्ति सिंह हिने लोकांना एकत्र येऊन आवाज उठविण्याचे केले आवाहन)

पोलिसांनी अजून 306 कलमाखाली अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे कदाचित मुंबई पोलिस या प्रकरणाला घराणेशाहीच्या दिशेने वळवून दाबायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी ते नकार देत आहेत. मात्र, असं असलं तरी आम्ही या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढू, असंदेखील विकास सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरूद्ध, पटनातील राजीवनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. रियावर, सुशांतला प्रेमात फसवून पैसे लाटणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता.