बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड माफिया आणि नेपोटिजम हा प्रकार देखील पुढे आला आहे. याबाबत मुंबई पोलिसांचा (Mumbai Police)तपास सुरु असताना सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांतला न्याय मिळावा यासाठी आता त्याचे संपूर्ण कुटूंब एकवटले असून आता त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ति (Shweta Singh Kirti) ने आपल्या सोशल अकाऊंटवर सर्वांनी सत्य समोर आणण्यासाठी एकत्र या असे आवाहन केले आहे.
श्वेता ने इनस्टाग्राम वर ही पोस्ट शेअर केली असून यामध्ये यामध्ये ती देवाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "सत्यासाठी एकत्र उभे राहा". श्वेता शेअर केलेला हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हारल होत आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
या फोटोखाली सुशांतचे तसेच श्वेताच्या चाहत्यांनी भरघोस प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक चाहते सुशांतच्या आत्म्यास शांति मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.
यात श्वेता ने एका यूजरच्या प्रश्नावर उत्तर देत असे म्हटले आहे की, "मुंबई पोलिसांचा रिपोर्ट आल्यानंतर ती सीबीआय चौकशीची मागणी करु शकते." श्वेता गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपला भाऊ सुशांत सिंह राजपूत याच्या आठवमीत सोशल मिडियावर अनेक पोस्ट करत असते.