अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने रविवारी आपल्या वांद्रेच्या (Bandra) घरात गळफास लावून आत्महत्या केली. काल विलेपार्ले (Villeparle) येथील स्मशान भूमीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतच्या अशा एग्झिट मुळे त्याचे सर्व चाहते आणि जवळची मंडळी अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिचे नाव सुद्धा बरेच चर्चेत आहेत. पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) या गाजलेल्या मालिके इतकीच सुशांत आणि अंकिताची जोडी सुद्धा बरीच गाजली होती. हे दोघे रियल लाईफ मध्ये सुद्धा डेट करत होते. कालांतराने त्यांच्यात वाद होऊन त्यांचे नाते संपले पण आता सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराला आधार देण्यासाठी अंकिता त्याच्या वांद्रेच्या घरी पोहचली आहे. यावेळचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
काही वेळेपूर्वीच अंकिता सुशांतच्या वांद्रेच्या घरी गेली होती. दिग्दर्शक संदीप सिंह याच्या सोबत अंकिताने सुशांतच्या परिवाराची भेट घेतली. जेव्हा सुशांतच्या निधनाची बातमी कळली तेव्हापासून तिच्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. एकीकडे आपला जवळचा व्यक्ती गमावल्याचे दुःख आणि दुसरीकडे अनेकांनी अंकिताला ट्रोल केल्याने तिची दोन्हीकडून पंचाईत झाली होती. तिची ही परिस्थिती तिच्या फोटोंमधून दिसून येत आहे.
अंकिता लोखंडे फोटो
दरम्यान, मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सुद्धा याबाबत एका मुलाखतीत सांगितले की, "अंकिता अजूनही या धक्कातून सावरलेली नाही, आणि लोक तिच्यावर आता आरोप लगावत आहेत. यामुळे तिला होणार त्रास बघवत नाही". प्रार्थनाने स्वतः लोकांना ट्रोलिंग थांबवण्याची विनंती केली आहे.