Sushant Singh Rajput Death: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचा Israel ला धक्का, ट्विट करुन व्यक्त केल्या भावना; फ्रान्सच्या स्पेस यूनिवर्सटीलाही दु:ख
Sushant Singh Rajput | | (Photo Credits: YouTube)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे निधन झाले. मुंबई येथील वांद्रे परिसरात असलेल्या निवसस्थानी त्याने पंख्याला गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या मृत्युचे कारण अस्पष्ट असल्याने मुंबई पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, सुशांत याच्या निधनाचा अनेकांना धक्का बसला. उल्लेखनीय असे की, केवळ भारतच नव्हे तर त्याच्या निधनाचा भारताबाहेरही अनेकांना धक्का बसला आहे. सुशांत याच्या निधनाचा (इस्रायल) Israel देशालाही धक्का बसला असून, देशाच्या नेत्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फ्रान्समधील इंटरनॅशनल स्पेस युनिवर्सिटी (International Space University France) नेही सुशांतच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर इस्रायलवरुन एक खास संदेश आला आहे. यात म्हटले आहे की, सुशात हा इस्रायलचा एक खास मित्र होता. इस्रायलच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाचे जनरल आणि टेप्युटी डायरेक्टर Gilad Cohen यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. ते इस्रायलचे एक अत्यंत खास दोस्त होते. आम्हाला आपली आठवण येईल. ते जेव्हा इस्रायलला आले होते तेव्हा काहीसे असे घडले होते'', असे म्हणून ट्विटसोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. (हेही वाचा, सिनेमात काम मिळाले नाही, तर फिल्मसिटीमध्ये कॅन्टीन सुरू करील; सुशांत सिंह राजपूतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

सुशांत सिंह राजपूत याचे इस्रायल कनेक्शन काय?

सुशांत सिंह राजपूत यांचा एक चित्रपट आहे. ज्यात त्याची आणि जैकलीन फर्नांडिस यांची जोडी दिसते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहायला मिळतो. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुशांत आणि त्याची टीम इस्रायलला गेली होती. या चित्रपटातील गाणे 'मखना'चे शुटींग इस्रायलमध्ये झाले आहे. संपूर्ण कास्ट इस्रायलमध्ये उपस्थित होती. त्याच गाण्याची एक लिंक Gilad Cohen ने शेअर केली आहे.

दरम्यान, सुशांत याच्या निधनानंतर फ्रान्सच्या स्पेस यूनिवर्सटीनेही श्रद्धांजली अर्पन केली आहे. फ्रान्सच्या यूनिवर्सटीने सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.स्पेस युनिवर्सिटीने आपल्या संकेतस्थळावर सुशांतबाबत म्हटले आहे की, समर 2019 मध्ये त्याने युनिवर्सिटीच्या सेंट्रल कॅम्पसमध्ये येण्याचे निमंत्रण स्वीकारले होते. परंतू काही कारणांमुळे ते स्ट्रासबोर्गला येऊ शकले नाहीत. आमची प्रार्थना, सद्भावना सुशांतचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यासोबत कायम असेन.