बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर (Social Media) त्याचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हि़डिओमध्ये सुशांत 'सिनेमात काम मिळालं नाही, तर फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टीन सुरू करीन, नाहीतर स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करील,' असं सांगत आहे. सुशांतचा हा व्हिडिओ व्हायरल भयानी (Viral Bhayani) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सुशांत म्हणाला आहे की, 'जेव्हा मी टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडली तेव्हा मी विचार केला होता की, मला जर सिनेमात काम मिळाले नाही, तर मी फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टीन सुरू करील, नाहीतर स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करेन.' नेपोटिझमचा वाद सुरू झाल्यानंतर सुशांतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईचे सलमान खान वर गंभीर आरोप; पहा व्हिडिओ)
या व्हिडिओमध्ये सुशांत पुढे म्हणाला आहे की, 'मी माझ्या पहिला सिनेमा 'काय पो छे'साठी 12 वेळा ऑडिशन दिली होती. तसचं दुसरा सिनेमा 'पीके' साठी 3 वेळा ऑडिशन दिली होती आणि माझा तिसरा सिनेमा यशराज बॅनरचा होता. त्यासाठी मी 1 महिना वर्कशॉप केलं होते. त्यानंतर ऑडिशन दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी अभिषेक, आदित्य चोप्रा किंवा हिरानी यांनी माझं टीव्हीवरील काम पाहिलं नव्हतं. त्यांना मी कोण आहे, हे देखील माहित नव्हतं. त्यांनी केवळ माझे ऑडिशन व्हिडीओ पाहून माझी निवड केली होती. त्यामुळे आपल्यामध्ये काम करण्याची क्षमता असेल, तर या क्षेत्रात कोणीही यशस्वी ठरू शकतं.