Sushant Singh Rajput Case: Rhea Chakraborty सह तिच्या परिवाराला अद्याप CBI चा समन्स मिळालेला नाही - रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांचे स्पष्टीकरण
रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput ) याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी सीबीआय टीम (CBI Team) मुंबई मध्ये दाखल झाली आहे. आता सीबीआयने चौकशी आणि तपासाची सुत्रं हातामध्ये घेतल्यानंतर त्याच्या मित्रांची आणि मृत्यूच्या वेळीउपस्थित लोकांची चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) देखील चौकशी होणार तिच्या कुटुंबाला समन्स पाठवण्यात आला आहे अशी वृत्त समोर येत असताना रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी अद्याप कुठलाही समन्स समोर आलेला नाही. तसेच भविष्यात तो मिळालाच तर त्यांची चौकशी यंत्रणेसमोर जाण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये जेव्हा मुंबईपोलिसांकडून हा तपास सीबीआय टीम करेल असा आदेश देण्यात आला होता तेव्हाच रियाच्या वकिलांनी भविष्यात रिया ज्याप्रकारे मुंबई पोलिस आणि ईडीच्या चौकशीला सामोरी गेली होती त्याप्रकारे सीबीआय चौकशीला सामोरी जाईल आणि संपूर्ण सहकार्य करेल असे सांगितले होते.

ANI Tweet

दरम्यान रिया चक्रवर्तीमुळे सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप करत सुशांतच्या वडीलांनी FIR दाखल केला आहे.