Surgical Strike 2: पाकिस्तानी कलाकारांना VISA देऊ नका,बॉलिवूडची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी (Photo Credits-Twitter)

भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) पाकिस्तान (Pakistan) विरोधात मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे भरभरुन कौतुक केले जात आहे. त्यामुळे आता ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशनने (AICWA ) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पाकिस्तानी कलाकारांना व्हिजा (VISA) न देण्याची मागणी केली आहे.

एआयसीडब्लूएने मोदी यांना पत्र लिहिले असून त्यांनी त्यामध्ये, पाकिस्तानी कलाकारांना व्हिजा देऊ नका. त्याचसोबत कोणताही भारतीय चित्रपट किंवा माहितीपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यावर बंदी घालावी अशी विनंती केली आहे. त्याचोसबत असोसिएशने असे ही म्हटले आहे की, आम्ही आशा करतो की भारत सरकार यावर कडक निर्णय लवकरच घेईल. दहशतवादी संघटनांना पाकिस्तान कडून पुरवण्यात येतो. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना ही बंदी घालण्यात यावी. भारतातील 1.3 अरब जनता मोदीजी तुमच्या पाठीशी उभी असल्याचा आत्मविश्वास या असोसिएशने मोदी यांना दिला आहे.

तर काही दिवसांपूर्वी कोणत्याही चित्रपटात पाकिस्तानी कलाकार अथवा म्युझिक व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायक सहभागी होऊ शकणार नाहीत, अशी भूमिका 'अखिल भारतीय सिने कामगार संघटना' (AICWA) ने घेतली आहे. तरी कोणत्या संस्थेने पाकिस्तानी कलाकारांना घेतले, तर त्यांच्यावर AICWA कडून बंदी घालण्यात येईल आणि कडक कारवाई केली जाईल असा इशारा संघटनेने दिला होता.