सनी लियोनी जेव्हा कोकाकोला सिनेमाच्या टीम सोबत बिहारी शैलीत बोलते.. (Watch Video)
सनी लिओनी. (Photo Credits : Instagram)

पॉर्न इंडस्ट्री (Porn Industry)  मधून थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनेत्री सनी लियोनी (Sunny leone) हिने रसिकांच्या मनात घर केलं.  सनीचा हॉट अवतार व नटखट स्वभाव हा नेहमीच  प्रेक्षकांवर तिची जादू पसरवत गेला. त्यानंतर तिने चित्रपट व रिऍलिटी शो मधून आपली छाप कायम ठेवली. अलीकडेच कोकाकोला (Kokakola) या नव्या सिनेमासाठी देखील तिचं नाव फायनल करण्यात आलं आहे. या सिनेमाची एक मीटिंग नुकतीच जुहूमध्ये पार पडली, या मीटिंग मधला सनीचा एक गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video)  झाला आहे. यामध्ये चित्रपटाच्या टीम सोबत सनी बिहारी (Bihari)  शैलीत बोलताना पाहायला मिळत आहे.हा व्हिडीओ अवघ्या काही सेकेंदाचा असला तरी तिच्या चाहत्यांमध्ये या व्हिडिओची बरीच चर्चा होत आहे.

तुम्हीच पहा काय म्हणतेय सनी लियोनी..

 

View this post on Instagram

 

When you are so much into the character!! 😂 #SunnyLeone #MethodActing #kokaKola #UP #BihariDialect

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

हा व्हिडीओ सनीने आपल्या इंस्टग्राम अकाउंट वरून शेअर करत कोकाकोला सिनेमातील तिच्या भूमिकेची झलक दाखवली आहे. यानंतर IANS ला मुलखात देताना, 'माझ्या कामासाठी नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला माझी तयारी असते. त्यामुळेच मी नवी भाषा शिकत आहे. यामुळे मी माझी व्यक्तीरेखा अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकेन. काम करता करता अशा नव्या गोष्टी शिकण्यात मजा येते. मी आता बिहारी भाषा बोलण्याच्या प्रयत्नात आहे.ही भाषा अचूकपणे बोलता यावी यासाठी भरपूर मेहनत करत आहे.' अशी प्रतिक्रिया सनीने दिली होती. IND vs PAK, ICC World Cup 2019: आपला बोल्ड फोटो शेअर करत Sunny Leone ने केले पावसाला दूर जाण्याचे आवाहन, (Photo)

अलीकडेच सनी लिओनी हिने आपला पती डॅनियल वेबर सोबत मुंबईतील जुहू परिसरात 'The Art Fusion Juhu' हे क्रिएटिव्ह स्टोअर सुरु करणार असल्याची माहिती दिली होती. याबाबत देखील इन्स्टा वर पोस्ट करून तिने आपण काहीतरी नवं करू पाहत आहोत असं म्हंटलं होतं. दरम्यान या व्हिडीओ नंतर कोकाकोला मधील सनी च्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.