Sunny Deol on Y-Category Security: भाजप पक्षाचे खासदार सनी देओल यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यासंदर्भात त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिले आहे. सनी देओल यांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. खरंतर कालापासून अशी बातमी चालवली जात होती की, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सनी देओल यांना Y सिक्युरिटी दिली गेली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर काही लोकांनी त्याला विरोध दर्शवला. कारण कृषि कायद्याच्या विरोधात पंजाब मध्ये सुरु असलेल्याा आंदोलनात भाजच्या नेत्यांना घेरले जात असल्याची चर्चा आहे.
सनी देओल यांनी Y सिक्युरिटी संदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, कालपासून चुकीचे मीडिया रिपोर्ट्स दाखवले जात असून त्यात मला Y सिक्युरिटी दिली गेल्याचे म्हटले आहे. मला जुलै 2020 पासूनच ही सुरक्षा दिली गेली आहे. त्यामुळे या सुरक्षिततेचा सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी मीडियाला विनंती करतो की, कोणतीही बातमी दाखवण्यापूर्वी त्यामधील तथ्य जाणून घ्या.(Urmila Matondkar चं Instagram Account रिस्टोर; मुंबई पोलिसांचे मानले आभार See Post)
Tweet:
कल से, कुछ गलत मीडिया रिपोर्ट्स है कि मुझे हाल ही में मुझे Y सुरक्षा मिली है। मुझे जुलाई 2020 से यह सुरक्षा प्रदान की गई है। इस सुरक्षा प्रावधान को चालू किसानों के आंदोलन से जोड़ने का प्रयास किया गया है जो गलत हैं।
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 17, 2020
दरम्यान, शेतकऱ्यांच्या संघटनांनी भाजप नेत्यांसह मंत्र्यांवर ही हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या सुरक्षितेत वाढ केली जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आता सनी देओलने स्पष्ट केले आहे की, माझी सुरक्षा आधीपासूनच वाढवली गेली आहे. तर सनी देओल पंजाब मधील गुरुदासपुर मधून भाजपचे खासदार आहेत.