Sukesh Chandrasekhar, Jacqueline Fernandez (PC - Twitter/ @news24tvchannel)

Sukesh Chandrasekhar: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील (Money Laundering Case) आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) चे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) वरील प्रेम संपण्याचे नाव घेत नाही आहे. अलीकडेच अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त महाठग सुकेशने अभिनेत्रीला पत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा पत्र लिहून जॅकलिन फर्नांडिसवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सुकेशने यावेळी इस्टरच्या निमित्ताने जॅकलिनने पत्र लिहिले आहे. अभिनेत्रीला इस्टरच्या शुभेच्छा देताना सुकेशने लिहिले की, 'माझं बेबी, माझी बोम्मा जॅकलीन, बेबी इस्टरच्या खूप खूप शुभेच्छा. हा तुझा वर्षातील आवडत्या सणांपैकी एक आहे, तुम्हाला इस्टर अंडी आवडतात. आजही या निमित्ताने मला तुझी खूप आठवण येत आहे.' (हेही वाचा - Shahid Kapoor आणि Kriti Sanon पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज)

सुकेशने पुढे लिहिले की, 'बेबी तू किती सुंदर आहेस याची तुला कल्पना नाही. या संपूर्ण जगात तुझ्यासारखा कोणी नाही. माझा बनी ससा. बाळा, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण कायमचे एकत्र राहण्यासाठी आहोत. मी कायम तुझ्यासोबत असेन. 'जेव्हा मी 'तुम मिली, दिल खिले और जीने को क्या चाहिये'चे नवीन व्हर्जन ऐकले, तेव्हा मला तुझी आठवण येऊ लागली. ही वेळ लवकरच निघून जाईल आणि नंतर चांगली वेळ येईल.'

दरम्यान, 32 वर्षीय सुकेश चंद्रशेखरवर देशभरात 20 हून अधिक केसेस दाखल आहेत. सुकेशला 2017 मध्ये AIADMK च्या शशिकला कॅम्पला दोन पानांचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सुकेशसंदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या खुलाशांमध्ये नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस, चाहत खन्ना, निक्की तांबोळी यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावेही समोर आली आहेत.