सुहाना खान हिचा 20 व्या वाढदिवसानिमित्त ग्लॅमरस Slo-Mo Video; तुम्ही पाहिलात का?
Suhana Khan (Photo Credits: Instagram)

शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिचा काल (22 मे) 20 वा वाढदिवस होता. सुहानाच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर मित्रमंडळी, चाहते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुहानाची खास मैत्रिण अनन्या पांडे हिने देखील खास फोटो शेअर करत तिला बर्थडे विश केलं. सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या खास फोटोज, व्हिडिओजने तिने आपला खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या बर्थडे निमित्तही स्लो मोशन व्हिडिओ (Slow Motion Video) शेअर करत तिने चाहत्यांना खूश केलं आहे. यात सुहानाने मॅक्सी घालता असून मोकळ्या हवेत एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भावेल, यात वादच नाही.

सुहाना फॅन क्लब नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात सुहानाची दिलखेचक अदा पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर 'I'm 20 hehe' असे लिहिले आहे. (Happy Birthday Suhana Khan: वाढदिवसानिमित्त सुहाना खान हिच्या हॉट फोटोजची खास झलक!)

पहा व्हिडिओ:

अलिकडेच सुहाना खान हिने आपले इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले आहे. त्यानंतर तिच्या फॉलोव्हर्सची संख्या झपाट्याने वाढली. इतकंच नाही तर तिच्या नावाने  सोशल मीडियावर अनेक फॅन क्लब अॅक्टीव्ह आहेत. सुहानाच्या  बॉलिवूड पर्दापणाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. परंतु, शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' मधून तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.