'स्त्री-2'ची (Stree 2) हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच आठवडे झाले असले तरीही अजून हा सिनेमा कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. लवकर या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना ओटीटीवरती देखील अनुभव घेता येणार आहे.  नुकतीच करण्यात आली आहे.  स्त्री 2' मध्ये श्रद्धा कपूरसोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहेत.  (हेही वाचा - Stree 2 Collection: श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका; थेट शाहरुख खानला दिली टक्कर, लक्ष 600 कोटीवर )

पाहा पोस्ट -

स्त्री-2 हा येत्या 27 सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. पंरतू सुरवातीच्या काही दिवस हा चित्रपट रेंटवर उपलब्ध असणार आहे.  27 सप्टेंबरनंतर काही दिवसांनी तुमच्या सब्सक्रिप्शनवर तुम्ही हा सिनेमा मोफत पाहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल.

दरम्यान चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवार 16 सप्टेंबरपर्यंत ‘स्त्री 2’ची एकूण कमाई 583.35 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे आता 600 कोटींचा टप्पा चित्रपट काही दिवसातच गाठेल यात काही शंकाच नाही. ‘सकनिल्क’च्या अहवालानुसार ‘स्त्री 2’ने 34 व्या दिवशी मंगळवार, 17 सप्टेंबर रात्री 9:50 वाजेपर्यंत 2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘Stree 2’चे एकूण कलेक्शन 585.35 कोटी रुपये झाले आहे. आता या चित्रपटाचे पुढचं टार्गेट 600 कोटी क्लबचं आहे.