सुप्रसिध्द बॉलिवूड (Bollywood) अभिनेता इम्रान हाश्मीवर (Emraan Hashmi) दिवसाढवळ्या दगडफेक (Stone Pelting) केल्या गेली आहे. हा संपूर्ण प्रकार काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामध्ये घडला आहे. संबंधीत प्रकरणी आरोपींना पहलगाम (Pahalgam) पोलिसांनी ताब्यात घेतल असुन  दगडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दगडफेकी (Stone Pelting) मागचं नेमक कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पहलगामच्या Pahalgam बाजारपेठेत फिरताना इमरान हाश्मी (Actor Emraan Hashmi) यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे.  अभिनेता इम्रान हाश्मी सध्या जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) सिनेमाचं शूटींग करत आहे.

 

चित्रपटाचं शूटींग आटोपल्यानंतर अभिनेता इम्रान हाश्मीसह (Actor Emraan Hashmi) इतर क्रू मेंमर पहलगाम (Pahalgam) मधील मार्केट फिरण्यासाठी गेले. दरम्यान काही लोकांनी इमरान हाश्मीसह त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांवर दगडफेक (Stone Pelting) करण्यास सुरुवात केली. अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi)  सध्या चित्रपट बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवर (Border Secrurity Force) आधारित चित्रपटाचं काश्मीरमध्ये शूटींग (Shooting) करत आहे. काही दिवस त्याने श्रीनगरमध्ये (Srinagar) चित्रीकरण पूर्ण केलं असून आता तो पहलगाम येथे पुढील चित्रकरण करत आहे. घडलेला हा प्रकार फारच विचित्र असल्याने पहलगाम पोलिस (Pahalgam Police) प्रकरणाची तपासणी करत आहे. (हे ही वाचा:- Falguni Pathak: फाल्गुनी पाठकच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल, तिकीट शुल्काचा मुद्दा उपस्थित)

 

जम्मू काश्मीर मधील श्रीनगरच्या एसपी कॉलेजमध्ये (SP College) चित्रीकरण संपल्यानंतर इमरान हाश्मीला (Actor Emraan Hashmi) एक झलक बघण्यासाठी त्याचे अनेक फॅन्स (Fans) वाट बघत होते. पण वाट पाहणाऱ्या चाहत्यांकडे इम्रानने पाहिलं देखील नाही अशा बातमी एका वेबसाईटद्वारे (Website) प्रकाशित करण्यात आली होती. या घटनेचा वचपा म्हणून तर पहलगाम (Pahalgam) मधील ही दगडफेक झालेली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.