Spark OTT: राम गोपाल वर्मा 15 मेला लाँच करणार स्वतःचा 'स्पार्क ओटीटी' प्लॅटफॉर्म; D Company होणार प्रदर्शित
Ram Gopal Varma (फोटो सौजन्य- फेसबुक)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीचा रोग  सुरू झाल्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. टीव्हीपेक्षा लोक ऑनलाईन कंटेंट पाहण्यावर जोर देत आहेत. संसर्गाची भीती आणि चित्रपटगृहांवरील निर्बंधांमुळे ओटीटीवरील करमणुकीस प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम, जी 5, नेटफ्लिक्स यांसारखे अनेक प्लॅटफॉर्म उदयास आले आहेत. आता काळाचे सौंदर्य लक्षात घेऊन प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) त्यांचा 'डी कंपनी' (D Company) हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज करणार आहेत. यासाठी त्यांनी नवा ओटीटी प्लॅटफॉर्म सादर केला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव आहे - स्पार्क ओटीटी (Spark OTT).

न्यूज 18 शी खास बातचीत करताना, राम गोपाल वर्मा यांना विचारले की, त्यांनी स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म का लाँच केला, तेव्हा दिग्दर्शक म्हणाले. ते ज्या शैलीमध्ये चित्रपट बनवण्यास प्राधान्य देतात, ती शैली कोणत्याही अडथळ्याविना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म आणला आहे. हा  ओटीटी प्लॅटफॉर्म शनिवारी (15 मे) लाँच होत आहे.

या व्यासपीठावर इतर ओटीटीप्रमाणेच टीव्ही शो, चित्रपट, लघु मालिका, वेब सिरीज दिसतील. विशेष म्हणजे राम गोपाल वर्माचा पुढील चित्रपट 'डी कंपनी' फक्त याच व्यासपीठावर प्रदर्शित होईल. दिग्दर्शकाच्या अनेक चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटदेखील अंडरवर्ल्डची कहाणी सांगतो. रामगोपाल यांना या चित्रपटाविषयी विचारले असता ते म्हणाले, हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील सदस्यांची खरी कथा आहे. 1980 ते 1982 दरम्यान दाऊदच्या जीवनात घडलेल्या वास्तविक घटना चित्रपटामध्ये दाखविण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Lesbian Crime, Action आणि सगळंच 'डेंजरस'; राम गोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट 'Dangerous' Traile पाहिलात का?)

हा चित्रपट 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे तो त्यावेळी प्रदर्शित होऊ शकला नाही. दरम्यान नुकतेच राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'डेंजरस' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. असे म्हणतात की हा चित्रपट भारताचा पहिला लेस्बियन क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे.