Sooryavanshi Box office collection: बॉक्स ऑफिसवर 'सूर्यवंशी' चित्रपटाचा धमाका, पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी रुपय

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट थिएटरमध्ये हिट ठरला. दिवाळीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने (Rohit Shetty) केले आहे. हा चित्रपट 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि देशातील 4000 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाने परदेशात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बॉक्स ऑफिसवर ‘सूर्यवंशी'ने ओपनिंग डे चांगली  रेकॉर्ड कमाई केली आहे. (हे ही वाचा Sooryavanshi: 'मुंबई पोलिसां'साठी 'सूर्यवंशीचं' स्पेशल स्क्रिनिंग.)

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे सांगितले आहे. ‘महाराष्ट्रात चित्रपटगृहे ५० टक्के उपस्थित सुरु करण्यात आली असून देखील सूर्यवंशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, पहिल्याच दिवशी चित्रपटाने २६ कोटी रुपयांची कमाई केली आहे’ या आशयाचे ट्वीट तरण आदर्श यांनी केले आहे.

चित्रपटाने जगभरात पहिल्याच दिवशी ८ कोटी १० लाख रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशात ३,५०० स्क्रीन्सवर आणि परदेशात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रात ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित चित्रपटगृहे सुरु करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटासोबत हॉलिवूड चित्रपट एटर्नल्स देखील प्रदर्शित झाला होता. पण सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

सूर्यवंशी हा चित्रपट मार्च 2020 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. लॉकडाऊननंतर हा चित्रपट 21 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनाच्या लाटेमुळे पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आली.