बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा 'सूर्यवंशी' हा (Sooryavanshi) चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त असतात. यासोबतच निर्माते हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. मुंबई पोलिसांसाठी ही खास स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. म्हणजेच सूर्यवंशी हा चित्रपट मुंबई पोलिसांना दाखवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना अक्षय कुमारचा चित्रपट खूप आवडला आहे. स्क्रीनिंग दरम्यान टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाजही ऐकू आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

 

हा पहा ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)