Sonu Sood च्या फोटोला दुधाने अभिषेक करुन चाहत्यांनी मानले आभार, आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल
Sonu Sood Viral Video (Photo Credits: Twitter)

कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. आतापर्यंत त्याने अनेक स्थलांतरित मजूरांना गावी पोहोचविण्यास मदत केली असून पैशाच्या स्वरुपात देखील मदत केली आहे. लॉकडाऊन दरम्यान तर त्यांना अनेक गोरगरिबांना देखील मदत केली. त्यामुळे मदत केलेल्या लोकांनीही त्याला देवाच्या जागी ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) चित्तूर जिल्हयात लोक सोनू सूदच्या फोटोला दुधाने अभिषेक घालत असाना दिसत आहे.

सोनू सूद अन्नधान्यांपासून कोरोना काळात आवश्यक त्या सुविधा गरजूंना पोहोचविण्याचे कामही केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारपासून अन्य राज्यांतील सरकारसुद्धा त्याचे कौतुक करत आहे.हेदेखील वाचा- Hema Malini ने कोरोना रुग्णांसाठी मथुरेत लावली Oxygen Enhancer Machine, ट्विटरवर फोटोज शेअर करुन दिली माहिती

सोनू सूदविषयी आदर आणि सम्मान व्यक्त करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी त्याच्या फोटोला दुधाने अभिषेक घातला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सोनू सूद ने देखील हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्री कालहस्ती येथील आहे. सोनू सूदने सोनू सूद फाउंडेशनची सुरुवात करुन गरजूंना मदत करण्याची सुरुवात केली. सोनूकडून प्रेरणा घेऊन अभिनेता गुरमीत चौधरीने सुद्धा लोकांना मदत करण्याचा विडा उचलला आहे.

दरम्यान सोनूने देशातील सर्वात मोठी रक्तपेढी (Blood Bank) तयार करण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. रक्तदात्यांना ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्याशी जोडणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. सोनू सूद यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे सांगितलं आहे की, 'दररोज 12 हजार लोक रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू पावतात. आपले वीस मिनिटे एखाद्याचा जीव वाचवू शकतात. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला डॉक्टर बनण्याची आवश्यकता नाही.' या व्हिडिओमध्ये नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. सोनू सूद यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, 'चला जीव वाचवू या. तुमची स्वतःची रक्तपेढी लवकरचं येणार आहे.'