Sonu Sood आता आंध्र प्रदेशात उभारणार Oxygen Plants; म्हणाला, ग्रामीण भारतला पाठिंबा देणार
Sonu Sood (Photo Credits: Twitter)

कोरोना साथीच्या आजारात सोनू सूद (Sonu Sood) एक मशीहा म्हणून उदयास आला आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत ते सर्वांना मदत करताना दिसत आहे. सोनू सूद हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यापासून ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यापर्यंत सर्व व्यवस्था करत आहेत. दरम्यान, सोनू अनेक राज्यांतील ग्रामीण भागात ऑक्सिजन प्लान्ट स्थापित करण्याची तयारी करत आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल आणि नेल्लोर येथे आपण प्रथम ऑक्सिजन प्लान्ट स्थापित करणार असल्याचे सोनू सूदने सांगितलं आहे.

सोनू सूद यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, नेलूरमधील आत्मकुर, कुर्नूल येथील सरकारी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट स्थापित केले जातील. (वाचा - Shilpa Shetty ने आपले संपूर्ण घर केले सॅनिटाइज; अभिनेत्री वगळता संपूर्ण कुटुंबाला झाली होती कोरोना विषाणूची लागण)

सोनूने म्हटलं आहे की, 'माझ्या ऑक्सिजन प्लांट्सचा पहिला सेट आंध्र प्रदेशातील कुर्नूल सरकारी रुग्णालय आणि पुढच्या महिन्यात जूनमध्ये आत्मकुर, नेल्लोर येथे जिल्हा रुग्णालयात उभारला जाईल. याचा मला आनंद आहे. यानंतर इतर गरजू राज्यांमध्येही अधिक प्लान्ट तयार केले जातील. भारताच्या ग्रामीण भागाला पाठिंबा देण्याची ही वेळ आहे.

अलीकडेचं आंध्र प्रदेशचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात सोनू सूदचे चाहते त्यांचे मोठे पोस्टर्स दाखवत होते. हा व्हिडिओ सोनू सूदने आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आणि त्यांचे आभार मानले होते.