Sonu Sood (PC - Facebook)

लॉक डाऊन (Lockdown)  काळात परराज्यात आपल्या कुटुंबापासून दूर अडकलेल्या कामगारांसाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा एक आशेचा किरण म्ह्णून काम करत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अडकलेल्या अनेक कामगारांना सोनुने स्वखर्चातून त्यांच्या मूळगावी परत पाठवले आहे. या कामगारांना प्रवास करण्यासाठी विविध बसेसची व्यवस्था त्याने केली आहे. या सर्व कामासाठी लागणारा खर्च अलिकडे एका मुलाखतीत सोनुने सांंगितला आहे. अनुपम चोप्रा यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणात सोनु ला प्रत्येक बस मागे लागणार्‍या खर्चाची विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना सोनुने सांगितले की,"प्रवासी कोठे जात आहेत यावर अवलंबून खर्च होतो, मात्र प्रत्येक बसमागे निदान 1.8  लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. अभिनेता सोनु सुद ने परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या घरी पाठवण्याच्या विनंंतीला दिलेली 'ही' उत्तरे पाहुन तुम्हीही व्हाल त्याचे फॅन,पहा ट्विटस

कोरोना व्हायरसचे संकट असताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागते. त्यामुळे एक बस पुर्ण पणे भरता येत नाही. परिणामी अधिक बसची गरज लागते. प्रत्येक बसमागे दोन लाखाइतका खर्च होत आहे पण जोपर्यंत शक्य होईल आणि सर्व गरजु कामगार आपआपल्या घरी पोहचत नाही तोपर्यंत काम थांबवणार नाही असे सोनु ने सांगितले आहे. अलिकडेच सोनुने शहरात अजूनही अडकलेल्या स्थलांतरितांसाठी आपले हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले होते. या नंंबर वर दिवसाला हजारो कॉल-मॅसेज येत असतात, यातील सर्वांपर्यंत पोहचणे नेहमी शक्य होत नाही यासाठी क्षमा मागत सोनुने अलिकडे एक व्हिडिओ शेअर केला होता. पहा हा व्हिडिओ

सोनु सुद ट्विट

दरम्यान, सोनुने यापुर्वी सुद्धा रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणा वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी मुंबई मधील आपले हॉटेल दान केले होते तसेच वेगवेगळ्या कोरोनाव्हायरस मदत निधीसाठी सुद्धा दान केले होते,त्यानंतर मागील कित्येक दिवसांपासुन तो मजुरांसाठी हे काम करत आहे. त्याच्या या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.