Sonu Sood (Photo Credits: Twitter)

देशभरात सुरु असलेल्या लॉक डाऊन (Lockdown)  काळात परराज्यात अडकलेल्या नागरिकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारच्या वतीने विशेष ट्रेन सुरु करूनही अजूनही अनेकजण परराज्यात अडकून पडले आहेत. अशा मंडळींसाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने स्वखर्चातून मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक नागरिकांना आतापर्यंत सोनुने त्यांच्या घरी पाठवले आहेत. त्याच्या या मदत कार्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यावर सारखी पसरली आहे, अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, समाजसेवी संस्थांनी सोनूच्या या कामाचे कौतुक केले आहे. मुंबईत अडकलेल्या अनेकांनी ट्विटर च्या माध्यमातून सोनू ला मदतीची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला साद देत सोनु शक्य होईल तेवढ्या सर्वांना ट्विटर वरून उत्तरे देत असतो. या उत्तरांमध्ये सोनू अगदी आपुलकीने रिप्लाय देत असल्याने एक सुंदर बॉण्डिंग ट्विटर वर पाहायला मिळत आहे. यातीलच काही निवडक ट्विट आपणही पाहुयात.. यात सोनूची आत्मीयता पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल हे निश्चित..

सोनू सूद ची परराज्यात अडकलेल्या नागरिकांना मदत

सोनू सूद याने सुरु केलेल्या या मदतीचे महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुद्धा खुप कौतुक केले आहे.

स्मुती इराणी ट्विट

जयंत पाटील ट्विट

दरम्यान, सोनू सूद याने आपल्याला संपर्क केलेल्या अनेक नागरिकांना आतापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील पोहचवले आहे. या नागरिकांसाठी सोनू खास बसची सुविधा करून स्वतःच्य खर्चातून ही मदत करत आहे.