Sonu Sood Offers Singing To Woman: 'मेरे नैना सावन भादो' गाताना महिलेचा Video व्हायरल, सोनू सूद याने थेट दिली ऑफर (पाहा व्हिडिओ)
Sonu Sood | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि त्याचे सामाजिक कार्य याबाबत आता सर्वांनाच माहिती झाले आहे. आपल्या कार्यातून तो नेहमीच चर्चेत असतो. आताही तो चर्चेत आला आहे. ही चर्चा आहे त्याने एका महिलेला केलेल्या (Sonu Sood Offers Singing To Woman) ऑफरमुळे. या महिलेचा व्हिडिओ सोनूने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला. जी महिला 'मेरे नैना सावन भादो' (Mere Naina Sawan Bhadon) हे गाणे गातानाचा व्हिडिओत दिसते.

इंटरनेट वापराचे फायदे तोटे अनेक सांगता येतील. पण एक गोष्ट आपल्याला नक्कीच मान्य करावी लागेल ती म्हणजे इंटरनेटने निर्माण केलेल्या संधी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची वाढलेली शक्यता. एकाच वेळी असंख्य लोकांसमोर व्यक्त होण्याची आफाट शक्ती. त्यामुळेच तर अनेक लोक त्यांच्या अद्वितीय कौशल्यामुळे आणि प्रतिभेमुळे रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनले आहेत. त्यापैकी एक महिला आहे जी 'मेरे नैना सावन भादों' हे लोकप्रिय बॉलिवूड गाणे गाऊन व्हायरल झाली होती. व्हायरल क्लिपने अभिनेता आणि मानवतावादी सोनू सूदचे लक्ष वेधून घेतले, जो तिच्या गाण्याने इतका प्रभावित झाला की त्याने त्या महिलेला चित्रपटांमध्ये गाण्याची संधी दिली. (हेही वाचा, Northern Railway Bashes Sonu Sood: सोनू सूदने केला चालत्या ट्रेनच्या दारात बसून प्रवास; भारतीय रेल्वेने अभिनेत्याला फटकारले)

सोनू सूद याने 27 जानेवारी रोजी ट्विटरवर 1976 च्या ‘मेहबूबा’ चित्रपटातील ‘मेरे नैना सावन भादों’ गाणाऱ्या महिलेचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने व्हिडिओत दिसणाऱ्या गाणाऱ्या त्या महिलेचा संपर्क क्रमांक मागितला जेणेकरून तो तिला चित्रपटांमध्ये गाण्यास संधी देऊ शकेल. व्हिडिओ रिट्वि करत म्हटले आहे की, तिचा नंबर पाठवावा. आई आता चित्रपटांसाठी गाणार आहे.

मुकेश कुमार सिन्हा यांनी शेअर केलेल्या मूळ क्लिपमध्ये ती महिला तिच्या मुलीच्या आग्रहावरून लता मंगेशकर यांचे गाणे गाताना दिसते. तिला सुरुवातीला संकोच वाटत असला तरी, बाई तिच्या स्वयंपाकघरात चपात्या करताना तिच्या भावपूर्ण आवाजात गाण्याचे बोल गाते. हे गाणे ती केवळ तिच्या मुलीच्या आग्रहाखातर गाते.