Northern Railway Bashes Sonu Sood: अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)ने कोविड-19 साथीच्या काळात लोकांना खूप मदत केली. त्याच्या या सामाजिक कार्यामुळे सोनूला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र सध्या सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तो चालत्या ट्रेनच्या दारात बसलेला दिसत आहे. त्यामुळे इंटरनेटवर आक्षेप घेतला जात असून आता उत्तर रेल्वेनेही हे धोकादायक असल्याचे सांगत सोनू सूदची खरडपट्टी काढली आहे.
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोनू सूदने 13 डिसेंबरला शेअर केला होता. 22 सेकंदांच्या क्लिपमध्ये सूद धोकादायकपणे चालत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ बसलेला आणि बाहेरची रेलिंग धरलेला दिसत आहे. तो येथे बसून बाहेर पाहत आहे. दरम्यान, 4 जानेवारी रोजी उत्तर रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटने सोनू सूदचा समाचार घेतला. उत्तर रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "प्रिय, @SonuSood, तुम्ही देशातील आणि जगातील लाखो लोकांसाठी एक आदर्श आहात. ट्रेनच्या पायर्यांवर प्रवास करणे धोकादायक आहे आणि या प्रकारचा व्हिडिओ तुमच्या चाहत्यांना चुकीचा संदेश देऊ शकतो. कृपया असे करू नका! आनंद घ्या! तुमचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होवो."
तथापी, मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयानेही सोनू सूदला इशारा दिला असून हे धोकादायक स्टंट आणि वास्तविक जीवनात करू नये. GRP मुंबईने ट्विट केले की, "फुटबोर्डवरील प्रवास हा चित्रपटांमध्ये 'मनोरंजन'चा स्रोत असू शकतो, वास्तविक जीवनात नाही! सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूया आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा."
प्रिय, @SonuSood
देश और दुनिया के लाखों लोगों के लिए आप एक आदर्श हैं। ट्रेन के पायदान पर बैठकर यात्रा करना खतरनाक है, इस प्रकार की वीडियो से आपके प्रशंसकों को गलत संदेश जा सकता है।
कृपया ऐसा न करें! सुगम एवं सुरक्षित यात्रा का आनंद उठाएं। https://t.co/lSMGdyJcMO
— Northern Railway (@RailwayNorthern) January 4, 2023
अनेक युजर्सनी सोनूबद्दल चिंता व्यक्त करत व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली. एका यूजरने ट्विट केले की, "ट्रेनच्या दारावर बसून प्रवास करणे अपघाताला आमंत्रण देण्यासारख आहे. तुम्ही लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहात, करोडो लोक तुमचे चाहते आहेत. असे केल्याने, तुमचे प्रियजन देखील असेच करू शकतात. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ काढून टाका आणि लोकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी प्रेरित करा."
दुसऱ्या एका फॉलोअरने लिहिले की, "लोक त्यांच्या रील हिरोंना आंधळेपणाने फॉलो करतात. त्यामुळे असा व्हिडिओ अपलोड करू नये. रीलच्या नायकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे."