Sonu Sood ने आयएएस विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केली Free Coaching Scholarship; पहा 'Sambhavam' साठी कसा कराल अर्ज
Sonu Sood's free coaching scholarships for IAS aspirants (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता आणि कोविड-19 संकटकाळात गरजूंसाठी देवदूत ठरलेला सोनू सूद (Sonu Sood) याने समाज कल्याणासाठी अजून एक पाऊल उचललेले आहे. आयएएसची (IAS) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय अभिनेत्याने घेतला आहे. यासाठी त्याने एक शिष्यवृत्ती लॉन्च केली आहे. 'संभवन' (Sambhavam) असं या योजनेचं नाव असून सोनू सूदने स्वत: ट्विट करत याची माहिती दिली आहे. (Sonu Sood च्या फोटोला दुधाने अभिषेक करुन चाहत्यांनी मानले आभार, आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल)

"आयएएसची तयारी करायची आहे. आम्ही घेत आहोत तुमची जबाबदारी," असं म्हणत सोनू सूदने ट्विटद्वारे संभवन लॉन्चिंगची घोषणा केली आहे. सूद चॅरिटी फाउंडेशन आणि दिया दिल्ली हा यांचा संयुक्त उपक्रम असून संभवनबद्दल अधिक माहिती सोनूच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचेही ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच ट्विटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी मोफत आयएएस प्रशिक्षण शिष्यवृत्ती देण्याची मी प्रतिज्ञा करतो, असं म्हटलं आहे.

Sonu Sood Tweet:

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज  http://www.soodcharityfoundation.org/ या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून याची अंतिम तारीख 30 जून आहे.

कोविड-19 संकटात सुरु केलेले मदतकार्य सोनूने अखंड सुरु ठेवले आहे. कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची शिफारस त्याने सरकारकडे केली आहे. तसंच यासाठी त्याने स्वत: देखील पुढाकार घेतला आहे. पंजाबमधील CT युनिव्हर्सिटीशी संलग्न होऊन त्याने कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण सुरु केले आहे.