Sonu Sood Helps UP Girl: अभिनेता सोनू सूद ने 22 वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

Sonu Sood Helps UP Girl: कोरोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूद अनेकांसाठी देवमाणूस ठरला. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजूरांना सोनू सूदने आपल्या गावी पोहोचवले. अजूनही सोनूचे मदतकार्य चालूच आहे. सोनू सूदने उत्तर प्रदेशमधील एका 22 वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे. सोनूच्या या मदत कार्यामुळे चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

सोनूने प्रज्ञा मिश्रा या मुलीला मदतीचा हात पुढे केला आहे. प्रज्ञाचे वडील गोरखपूर येथील स्थानिक मंदिराचे पुजारी आहेत. लॉकडाऊन काळात उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. प्रज्ञाच्या पायाला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास सांगितली होती. मात्र, तेवढे पैसे प्रज्ञाच्या कुटुंबाकडे नव्हते. त्यामुळे तिने शस्त्रक्रियेसाठी सोनू सूदकडे आर्थिक मदत मागितली होती. (हेही वाचा - Disha Salian हिच्या मृत्यूबद्दल अफवा पसरवणार्‍या तिघां विरूद्ध तिच्या वडिलांनी मुंबई पोलिसांकडे केली लेखी तक्रार)

दरम्यान, प्रज्ञाने आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटलं आहे की, ‘सोनू सूद सर कृपया माझी मदत करा. मी गेली कित्येक दिवस तुमच्याकडे मदत मागत आहे. मला अपंग होण्यापासून वाचवा,’ अशी कळकळीची विनंती प्रज्ञाने सोनू सूदकडे केली होती. त्यानंतर काही दिवसातचं सोनूने प्रज्ञाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देऊ केली.

प्रज्ञाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिने ट्विटरवरून सोनूचे आभार मानले आहेत. यात तिने म्हटलं आहे की, ‘आई असे म्हणते की, देव हा जमिनीवरचं असतो. आज मला आईचे म्हणणे पटले. जेव्हा सर्व नातेवाईकांनी मदत करण्यास नकार दिला. तेव्हा तुम्ही मदतीचा हात पुढे केला. तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्हीच मला नवीन आयुष्य दिलं.’