Disha Salian हिच्या मृत्यूबद्दल अफवा पसरवणार्‍या तिघां विरूद्ध तिच्या वडिलांनी मुंबई पोलिसांकडे केली लेखी तक्रार
Disha Salian (Photo Credits-Twitter)

सुशांत सिंह राजपूतसह (Sushant Singh Rajput) बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची मॅनेजर राहिलेली दिशा सलियन (Disha Salian) हिच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. ती तिच्या राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र त्यानंतर तिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला, तिच्यावर बलात्कार झाला होता अशा अनेक अफवा समोर आल्या होत्या. या अफवा पसरवणा-या तिघांविरुद्ध दिशाच्या वडिलांनी मुंबईतील मालवणी पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.

दिशा हिने सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणूनही काम पाहिले होते. दिशाचा मृत्यू 8 जूनला झाला. त्याच्या ठिक आठवड्याभराने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी समोर आली. त्यामुळे या दोघांच्या मृत्यूचाही अनेकांना संबंध लावला. यामुळे तिच्या मृत्यूबाबत वाढलेल्या अफवांना कंटाळून तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली. दिशा सलियन हिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढल्याची बातमी चुकीची, पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

दिशा सलियन हिने काही मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन कंपन्यांसोबत काम केले आहे. तसेच सुशांत सिंह रजपूर आणि वरुण शर्मा यांच्यासह भारती सिंह सारख्यांचे सुद्धा काम दिशा हिने सांभाळले आहे. त्याचसोबत क्राइम पेट्रोल मध्ये काम करणारी अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने सुद्धा स्वत:च्या घरात आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. प्रेक्षा हिच्याबाबत बोलायचे झाल्यास लॉकडाऊनमुळे ती फार त्रस्त होती. त्यामुळेच तिने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते.