Social Media Fake Followers Racket Case: फेक फॉलोअर्स प्रकरणी गुन्हे शाखेत रॅपर बादशहा दाखल
Rapper Badshah (Photo Credits-Instagram)

मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) गुरुवारी बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशहा (Rapper Badshah) याला फेक सोशल मीडिया फोलॉअर्स प्रकरणी समन्स धाडले होते. त्यामुळे आज दुपारी 1 वाजता त्याला गुन्हे शाखेच्या ऑफिसात येणे अनिवार्य असल्याने तो तेथे दाखल झाला आहे. बादहशहा हा पहिलाच सेलिब्रेटी आहे ज्याला गुन्हे शाखेकडून समन्स धाडण्यात आले आहे. रिपोर्ट्स नुसार गुन्हे शाखेकडून दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना समन्स धाडण्याची शक्यता आहे.

29 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी रेडिओ जॉकी अब्बास आणि माजी आयपीएल कॅमेंटिटर, अभिनेता गौरव कपूर यांना फेक सोशल मीडिया फॉलोअर्स प्रकरणी समन्स धाडले होते. यांनी Chtrbox Digital Company मध्ये गुंतवणूक केली असून ती प्रणय स्वरुप यांच्या मालिकीची आहे. स्वरुप यांनी एका विधानात असे म्हटले आहे की, त्यांच्याकडे 30 हजार क्लाऐंट्स असून या सर्वांच्या प्रोफाइलची माहिती गुन्हे शाखेला द्यावी. परंतु प्रणय यांनी त्यांनी या संबंधित कागदपत्रे देण्यास नकार दिला जी पोलिसांनी त्यांच्याकडून मागितली होती.(Fake Followers Racket: क्रिकेट भाष्यकार व VJ Gaurav Kapur आणि RJ Roshan Abbas यांना बनावट फॉलोअर्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावला समन्स)

Chtrbox ही सर्वांमध्ये अग्रगण्य असलेली सोशल मीडिया इन्फ्युअेंसर मार्केट कंपनी आहे. गेल्या वर्षात तब्बल 49 मिलियन इन्स्टाग्राम युजर्सची खासगी माहिती लीक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी सोशल मीडियातील फेक फॉलोअर्स प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. यामध्ये काही बॉलिवूड कलाकार, खेळाडू आणि काही हाय प्रोफाइल बिल्डर्स यांचा समावेश असून त्यांनी फोलोअर्स विकत घेतले असल्याचा आरोप सुद्धा केले होता.

बॉलिवूड मधील गायिका भुमिका त्रिवेदी हिचे सोशल मीडियात फेक प्रोफाइल असल्याचे समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी अद्याप तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. यामध्ये काही बॉलिवूड कलाकार, खेळाडू आणि जवळजवळ 176 हायप्रोफाइल यांचे Paid Followers असल्याचे समोर आले होते.