Fake Followers Racket: क्रिकेट भाष्यकार व VJ Gaurav Kapur आणि RJ Roshan Abbas यांना बनावट फॉलोअर्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावला समन्स

बनावट सोशल मीडिया फॉलोअर्स रॅकेट प्रकरणातील चौकशीसाठी क्रिकेट पोलिस टीकाकार व व्ही.जे. गौरव कपूर आणि आर.जे. रोशन अब्बास यांना मुंबई पोलिस एसआयटीने बोलावले आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

Fake Followers Racket: क्रिकेट भाष्यकार व VJ Gaurav Kapur आणि RJ Roshan Abbas यांना बनावट फॉलोअर्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावला समन्स
गौरव कपूर आणि रोशन अब्बास (Photo Credit: Instagram)

बनावट फॉलोअर्स रॅकेट प्रकरणातील (Fake Followers Racket) चौकशीसाठी क्रिकेट भाष्यकार व VJ गौरव कपूर (Gaurav Kapur) आणि RJ रोशन अब्बास (Roshan Abbas) यांना मुंबई पोलिस एसआयटीने (Mumbai Police ATS) समन्स बजावले. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी ANIला ही माहिती दिली. शनिवारी मुंबई पोलिसांच्या SITने 25 जणांची पडताळणी केली. यापैकी बहुतेक सोशल मीडिया व्यवसायातील आहेत. एसआयटी टीमने या प्रकरणातील चौकशीला बाधा येऊ शकते म्हणून या व्यक्तींची नावे जाहीर केली जाणार नाहीत असे म्हटले होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) नंदकुमार ठाकूर म्हणाले, "मुंबई पोलिस SITने आत्तापर्यंत २ 25 जणांची पडताळणी केली आहे. या प्रकरणात काही जणांनी साक्षीदार म्हणून त्यांचे निवेदन नोंदवले आहे." ते म्हणाले, “पोलिस चौकशीअंतर्गत असलेल्या लोकांची नावे जाहीर करणार नाहीत कारण यामुळे चौकशीला अडथळा येऊ शकतो.”

डीसीपी ठाकूर म्हणाले, "ज्या लोकांची ओळख पटली किंवा ज्यांची निवेदने नोंदविली त्यातील बहुतेक लोक सोशल मीडिया व्यवसायातले लोक आहेत." आठवड्याच्या सुरुवातीस मुंबईचे सहआयुक्त आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एका निवेदनात तपास केला असता या रॅकेटमध्ये 54 कंपन्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले असल्याचाखुलासा केला होता. मुंबई पोलिसांकडून अशी माहिती उघडकीस आल्यानंतर थोड्या वेळातच बनावट अनुयायी पुरवणाऱ्या कंपन्यांकडून सेवा वापरल्या जाणार्‍या जवळपास 100 सेलिब्रिटीज असल्याचे समोर आले होते.

अहवालानुसार 176 उच्च प्रोफाइल सेलिब्रिटींनी फॉलोअर्स मिळविण्यासाठी पैसे दिले आहेत आणि अशा सेवा वापरल्या गेलेल्या सेलिब्रिटींची यादी 2019 च्या अभ्यासावर आधारित आहे. अहवालानुसार चौकशीअंती त्यांना सापडलेली अशी एक वेबसाइट फ्रान्सची असून हे रॅकेट जागतिक स्तरावरील असल्याचापोलिसांना विश्वास आहे. या प्रकरणा संदर्भात मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात बनावट फॉलोअर्स विक्रीच्या आरोपाखाली 29 वर्षीय काशिफ मन्सूरला अटक केली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सूरने आत्तापर्यंत 25,000 ऑर्डर पूर्ण केल्या होत्या आणि 2.3 कोटीबनावट फॉलोअर्स विकले होते. तपासादरम्यान एसआयटीला बनावट सोशल मीडिया फॉलोअर्सची विक्री करणार्‍या सुमारे 100 कंपन्या सापडल्या.

(एएनआय इनपुटसह)

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2020 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).