दीपिका-रणवीरच्या चाहत्यांची स्मृती ईरानी यांनी उडवली खिल्ली; शेअर केला खास फोटो
स्मृति इराणी, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण (Photo Credits: File Photo)

बॉलिवूडची मस्तानी आणि बाजीराव अर्थात दीपिका पदुकोण-रणवीर सिंगच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. काल इटलीतील कोमो या सुंदर ठिकाणी दोघेही विवाहबद्ध झाले. कोकणी परंपरेने हा विवाहसोहळा पार पडला. पण या विवाहसोहळ्याचे फोटोज काही चाहत्यांना पाहायला मिळाले नाहीत. मात्र चाहते उत्सुकतेने फोटोजची वाट पाहत होते.

त्यामुळे दीपिका-रणवीरच्या विवाहसोहळ्याच्या फोटोजचे वाट पाहणारे चाहते आणि मीडिया यांची स्थिती पाहुन स्मृती ईरानी यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत एक हाडांचा सांगाडा बाकावर बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत स्मृती ईरानी यांनी लिहिले की, "जेव्हा तुम्ही रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत असता."

 

View this post on Instagram

 

#when you have waited for #deepveer #wedding #pics for too longgggg

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

फोटोजबद्दल चाहते आणि मीडियाला असलेली उत्सुकता स्मृती ईरानींच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे मीम सोशल मीडियावर शेअर केले. रणवीर-दीपिकाने आपल्या विवाहसोहळ्यात कॅमेरे, ड्रोन यांनी बंदी घातली होती. त्याचबरोबर विवाहस्थळी चारही बाजूला सुरक्षारक्षक तैनात होते.