..जेव्हा त्याने मुकेश अंबानी यांना थेट सांगितले 'सर जिओ चालत नाही'
दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये अंबानी परिवार (Photo Credit: Instagram)

Mukesh Ambani at Deepika-Ranveer Wedding Reception: इटलीमध्ये धुमधडाक्यात विवाहबद्ध झाल्यावर बॉलिवुडचे चर्चित दाम्पत्य दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh)भारतात परतले. त्यानंतर त्यांनी सरत्या वर्षातील (2018) शेवटच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मेगा रिसेप्शन ठेवले. या रिसेप्शनला अभिनेते अमिताभ बच्चन, रेखा, सैफ अली खान, विद्या बालन, जूही चावला, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, कतरीना कैफ, हृतिक रोशन यांच्यासारखे अनेक सेलिब्रेटी पर्सनालिटी पोहोचल्या. पण, भारतीय उद्योग-व्यवसायातील एक प्रमुख समूह असलेल्या रिलायन्स (Reliance)इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानीही (Mukesh Ambani) सहपरिवार पोहोचले. त्यामुळे त्यांची छबी टीपायाल प्रसारमाध्यमे चांगलीच सरसावली. अंबानी परिवारही फोटोसाठी मीडियाला पोज देत होता. दरम्यान, एका व्यक्तिने अंबानी यांच्याकडे थेट तक्रार केली की, सर जिओ चालत नाही(Sir, Jio nahi chal raha). सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, 'सर जिओ चालत नाही', हे शब्द अंबानी परिवार आणि स्वत: मुकेश अंबानी यांच्याही कानावर पडले. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या चेहऱ्यावर शक्य तितके हसरे भाव ठेवले. त्यानंतर काही काळ अंबानी परिवाराने मीडियाला फोटोसाठी पोझ दिल्या. सध्या मात्र या फोटोंपेक्षा 'सर जिओ चालत नाही' या व्हिडिओचीच चर्चा सोशल मीडियात अधिक आहे. (हेही वाचा, )पार्टीत Farhan Akhtar आणि Shibani Dandekar यांची एकत्र एन्ट्री (Video)

 

View this post on Instagram

 

#ambani family at #deepikapadukone #ranveersingh #weddingreception #deepveerkishaadi @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी इटलीत विवाह केला. त्यानंतर दोघांनी मिळून बंगळुरु आणि मुंबईत रिसेप्शन ठेवले. या दाम्पत्याचे चाहत्यांनी दीपवीर असे नामकरण केले आहे. दीपवीरचे पहिले रिसेप्शन बंगळुरुच्या द लीला पॅलेज हॉटेलमध्ये झाला. या रिसेप्शनला केवळ जवळचे दोस्त आणि कुटुंबीयच उपस्थित होते. १ डिसेंबरचे रिसेप्शन मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये झाले. या रिसेप्शनला बॉलिवुड स्टार्स आणि काही उद्योगपती सहभागी झाले.