Deepika-Ranveer Reception Party: पार्टीत Farhan Akhtar आणि Shibani Dandekar यांची एकत्र एन्ट्री (Video)
फरहान अख्तर-शिबानी दांडेकर (Photo Credit: Instagram)

Deepika-Ranveer Reception Party: अलिकडेच स्टार कपल दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचे मुंबईतील रिसेप्शन पार पडले. खास बॉलिवूडकरांसाठी आयोजित केलेल्या रिसेप्शन सोहळ्यात अनेक स्टार्सने हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीत फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हे चर्चित कपल एकत्र दिसले. फरहान-शिबानीच्या अफेअरची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. पण दोघांनीही या नात्याला दुजोरा दिलेला नाही. बॉलिवूड कलाकार आणि खेळाडू सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये मुंबईत रंगली #DeepVeer ची खास पार्टी

फरहान-शिबानी यांच्या सोशल मीडिया पोस्ट यांच्या रिलेशनशीपचा इशारा देतात. पण या दोघांनीही हे नाते मान्य केले नसले तरी दीपवीरच्या रिसेप्शनला दोघांनी हातात हात घेऊन एन्ट्री मारली. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर रिलेशनशिपमध्ये?

तुम्हीही पाहा हा खास व्हिडिओ...

2017 मध्ये फरहान अख्तर आणि अधुना अख्तर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर फरहानचे नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जोडले गेले. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर फरहान-शिबानी ही जोडी एकत्र स्पॉट झाली. त्यानंतर  यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले.