Deepika-Ranveer Reception Party :बॉलिवूड कलाकार आणि खेळाडू सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये मुंबईत रंगली #DeepVeer ची खास पार्टी
Deepika Ranveer Reception (Photo Credit : Instagram / Viral Bhayani)

Ranveer- Deepika Reception Party : इटलीमध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर रणवीर (Ranveer Singh)  आणि दीपिका पदुकोण  (Deepika Padukone )यांच्या लग्नाची दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन मुंबई आणि बंगळुरू मध्ये करण्यात आलं होतं . पण बॉलिवूड कलाकारांसाठी खास मुंबईच्या ग्रँड हयात (Grand Hyatt Mumbai) हॉटेलमध्ये 1 डिसेंबरच्या मध्यरात्री पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक मान्यवरांनी या पार्टीला हजेरी लावली होती. पूर्वी भारतीय साड्या आणि ब्रायडल ड्रेसमध्ये दिसणारी दीपिका मुंबईच्या रिसेप्शन पार्टीमध्ये खास लाल रंगाच्या वेस्टर्न गाऊनमधे दिसली. मीडिया आणि चाहत्यांसोबत खास सेल्फी क्लिक करून मुंबईत या पार्टीला सुरुवात झाली. Deepika Ranveer Wedding: तर असा साकारला दीपिका रणवीरचा वेडींग ड्रेस! (Videos)

रणवीर दीपिकाच्या मुंबईतील रिसेप्शन पार्टीमध्ये मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या पत्नीसोबत आला होता. सध्या सिम्बा सिनेमात सिद्धार्थ आणि रणवीर एकत्र काम करत आहे. सोबतच श्रेयस तळपदे, राधिका आपटे, रितेश देशमुख, कारण जोहर, अर्जुन कपूर, वरूण धवन, मलायका अरोरा, रेखा, शाहरुख खान, सारा अली खान, सैफ, करीना, ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन यांसोबतच शाहरुख खान, संजय लीला भंसाळी आदी बॉलिवूडचे सितारे यांनी रणवीर दीपिकाच्या पार्टीला हजेरी लावली होती. Deepika Ranveer Mumbai Grand Reception: रिसेप्शन पार्टीत दीपवीरचा शाही अंदाज (Photos)

 

 

 

 

View this post on Instagram

 

King is here! #ShahRukhKhan at #DeepikaPadukone and #RanveerSingh's wedding reception!

A post shared by Latestly (@latestly) on

बॉलिवूडकरांसोबतच सचिन तेंडुलकर, महेश भूपती, महेंद्र सिंग धोनी आदी क्रिकेटर्स देखील दीपिका रणवीरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहचले.