तरुणीशी लैंगिक गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी गायक Mika Singh ला Dubai मध्ये अटक
गायक मिका सिंग (फोटो सौजन्य- ट्विटर)

भारतीय प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) ह्याला दुबई (Dubai) च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर मिकाने 17 वर्षीय ब्राझिलियन तरुणीशी लैंगिक गैरवर्तवणूक (Sexual Assault) केल्याचा आरोप केला आहे.

ब्राझिलियन तरुणीने तिला मिका सिंगने अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. या प्रकरणी यूएई (UAE) मधील प्रशासनाने यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिकाला पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी कोर्टात उभे करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वीही मिकाने 2016 मध्ये एका मुंबईतल्या तरुणीचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने संगीत रनजीत या डॉक्टरांशी गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र मिकाची त्यावेळी जामिनावर सुटका करण्यात आली होती.

तसेच 2006 मधील मिकाच्या बर्थडे पार्टीतील राखी सावंतचे प्रकरण चांगलेच रंगले होते. त्यावेळी सुद्धा मिकाने राखी सावंत हिचे चुंबन घेतले होते. मात्र त्यानंतर या वादाला दुजोरा देत राखीने त्यांच्या दोघांमधील मतभेद मिटविले आहेत.