बॉलिवूड गायक लकी अली (Lucky Ali) यांच्या मृत्यूच्या बातम्या सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. पण यामध्ये तथ्य नसून त्या केवळ अफवा आहेत. लकी अली ठणठणीत असून त्यांच्या फार्म हाऊस वर असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंगळवार (4 मे) च्या संध्याकाळपासूनच इंटरनेट वर सोशल मीडियात लकी अली यांच्या निधनाच्या बातम्या धुमाकूळ घालत होत्या. पण त्यांची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री नफीसा अली (Nafisa Ali) यांनी मीडीयाला माहिती देताना लकी अलींच्या निधनाबाबत आलेल्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्या निधनाचं वृत्त खोटं असून ते अगदी ठीक असल्याचं देखील सांगण्यात आले आहे.
ई टाईम्स सोबत झालेल्या नफीसा यांच्या बातचीतीमध्ये त्यांनी सांगितलं- 'आज दिवसभरात 2-3 वेळेस लकी अलींसोबत बातचित केली आहे. त्यांना कोविड 19 ची बाधा झालेली नाही. त्यांच्या शरीरात अॅन्टीबॉडीज आहेत. ते आपल्या म्युझिक कॉन्सर्ट आणि म्युझिक चं प्लॅनिंग़ करत आहेत. आम्ही व्हर्च्युअली कॉन्सर्टला घेऊन चर्चा करत आहोत. मी स्वतः त्यांच्याशी बोलले आहे आणि ते ठीक आहेत.
Lucky is totally well and we were chatting this afternoon. He is on his farm with his family . No Covid . In good health.
— Nafisa Ali Sodhi (@nafisaaliindia) May 4, 2021
View this post on Instagram
लकी सध्या मीडीया स्पॉटलाईट पासून दूर आहेत पण त्यांचे फॅन्स आजही सोशल मीडीयात त्यांची नवी, जुनी गाणी एंजॉय करतात. ती गाणी वायरल देखील होत आहेत. नुकतच त्यांचं ' ओ सनम' गाणं तुफान वायरल झालं आहे. या वायरल गाण्यावर संगीत प्रेमींनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.