Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेने दिली स्वत:च हेल्थ अपडेट
Shreyas Talpade

अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 ऑक्टोबर 2023 रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. सध्या श्रेयसवर उपचार सुरू आहेत. श्रेयसची अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे. श्रेयसला अद्यापही डिस्चार्ज मिळालेला नसून त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. आता हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसने स्वत: हेल्थ अपडेट (Health Update) दिली आहे. एका न्यूज चॅनलला श्रेयसने आपल्या आरोग्या संदर्भातली माहिती दिली.  (हेही वाचा - Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने दिले अभिनेत्याच्या प्रकृतीसंदर्भात 'हे' अपडेट)

या मुलाखतीत चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार श्रेयसने मानले आहेत. श्रेयस म्हणाला,"तुमचा पाठिंबा आणि प्रार्थनेसाठी खूप-खूप आभार. आता माझी प्रकृती पूर्वीपेक्षा ठिक आहे. अद्याप रुग्णालयातच माझ्यावर उपचार सुरू आहेत".  श्रेयस सध्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो घरी गेला. अॅक्शन सीन्स शूट केल्यामुळे अस्वस्थ वाटत असल्याचं अभिनेत्याने त्याच्या पत्नीला सांगितलं. त्यानंतर श्रेयसची पत्नी दिप्ती त्याला घेऊन रुग्णालयात घेऊन गेली. रुग्णालयात जात असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला.

श्रेयस लवकरच कंगना रनौतच्या  'इमरजेन्सी' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचाही तो भाग आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.